शासकीय रेखाकला परीक्षा उत्साहात संपन्न !
फुलगाव : हरी उद्धव धोत्रे विद्यालय परीक्षा केंद्रावर ४४२ विद्यार्थी सहभागी
फुलगाव, ता. हवेली : येथील हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयातील शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रावर एलिमेंटरी व इंटरमीडिएट शासकीय रेखाकला परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. या परीक्षेसाठी विविध शाळांमधील एकूण ४४२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये एलिमेंटरी परीक्षेसाठी २१५,तर इंटरमीडिएट परीक्षेसाठी २२७ विद्यार्थी सहभागी झाले.
या परीक्षा केंद्रावर डॉ.बसू विद्याधाम, लोणीकंद,होली स्पिरिट स्कूल, युनिवर्सल स्कूल, नेताजी सुभाषचंद्र मिलिटरी स्कूल, किलबिल स्कूल व अनुश्री स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
शासकीय रेखाकला परीक्षेचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्याच्या दृष्टीने महत्त्व असून,अभियांत्रिकी,आर्किटेक्चर,आयटीआय तसेच कला क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी या परीक्षेतील प्रमाणपत्राचा उपयोग होतो.तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठीही या परीक्षेचा लाभ मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेबाबत विशेष उत्सुकता असते.
परीक्षा केंद्राला संस्थेचे अध्यक्ष संजय धोत्रे,सहभागी शाळांचे मुख्याध्यापक तसेच अनेक पालकांनी सदिच्छा भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
परीक्षेचे केंद्र संचालक केकाण एस.बी.व केंद्रप्रमुख जाधव एस.एल.यांनी नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा व्यवस्थापन केले.परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी करपे सर,गायकवाड सर,काकडे मॅडम,हेळकर सर,जंगले सर तसेच सेवक राजगुरू नाना,पाटोळे नाना, फुलगावकर ताई व चव्हाण ताई यांनी सहकार्य केले.