• Total Visitor ( 711418 )
News photo

मांडा परिसरात ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान...

Raju Tapal publisher October 03, 2026 23

मांडा परिसरात ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान....

गांधी जयंतीनिमित्त ९० फूट रिंगरोड व उड्डाणपुल परिसरात स्वच्छता अभियान

टिटवाळा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छ शहर, स्वच्छ भारत’ या संकल्पनेतून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

प्रभाग क्रमांक ३ मधील मांडा (पश्चिम) येथील ९० फूट रिंगरोड तसेच मांडा पूर्व-पश्चिम उड्डाणपूल परिसरात या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात माननीय नगरसेवक बंदेश जाधव यांनी सहभागी होत स्वच्छता मोहिमेला हातभार लावला.

या उपक्रमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासोबतच परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देण्यात आला. ‘स्वच्छ शहर, स्वच्छ भारत’ या संकल्पनेला नागरिकांनीही सहकार्य करून सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छता राखावी, असे आवाहन करण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement