विधान भवनावर शिक्षकांची धडक
मुख्यमंञी व शिक्षणमंञ्यांना निवेदन
मोर्चाला शिक्षक आमदारांची भेट
शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती व नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे आयोजन
अमरावती-जि.प. स्तरावरील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत ९ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विधी मंडळ अधिवेशनावर सामुहिक रजा आंदोलन व महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.हा मोर्चा यशवंत स्टेडीयम वरुन निघुन विधान भवनावर धडकला शिक्षकांच्या मागण्यांनी नागपूर शहर दुमदुमले.या मोर्चाला शिक्षक आमदार यांनी भेट देऊन या मागणीचे विधान परीषद मध्ये प्रश्न उपस्थित करु असे आश्वासन दिले.हा मोर्चा शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती व नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आयोजन केले होते मोर्चाचे नेतृत्व प्राथमिक शिक्षक समिती नागपूरचे जिल्हाध्यक्ष लिलाधर ठाकरे यांनी केले होते.या मोर्चात शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबेसह राज्यभरातुन हजारो शिक्षक सहभागी झाले होते अशी माहीती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली. या मोर्चाचे निवेदन मुख्यमंञी व शिक्षणमंञी यांना देण्यात आले.या वेळी मागण्यांन मध्पे जि.प. प्रशासनाकडून सोडवणूक होत नसल्याने महाराष्ट्रासह नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती च्या माध्यमातून दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी सामुहिक रजा आंदोलन व धडक मोर्चा चे आयोजन करण्यात आले असुन या आंदोलनाचे माध्यमातुन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न व मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येत आले मागण्या :-पात्र शिक्षकांना निवडश्रेणी मंजुरीबाबतची रखडलेली प्रक्रिया तातडीने पुर्ण करावी.पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. वरिष्ठ वेतनश्रेणीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी. केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रीया तातडीने पार पाडावी. सेवापुस्तिकेतील वेतननिश्चीती व इतर आर्थिक नोंदीचे प्रमाणीकरणाची प्रलंबीत प्रकरणे लेखा व वित्त विभागाकडून तातडीने निकालात काढावी. केंद्रप्रमुख पदोन्नतीतील अनियमिततेला जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी. सेवानिवृत्त शिक्षकांचे आर्थिक व सेवाविषयक सर्व प्रकारच्या लाभाची प्रलंबीत प्रकरणे निकाली काढावीत. जि.प. नागपूर मधील ५०० सेवानिवृत्त शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरणाचे रू. २०० कोटीचे थकीत अनुदान अदा करणे. समग्र शिक्षा संयुक्त अनुदान, शाळांना तातडीने उपलब्ध करून दयावे. ४ टक्के सादील अनुदान उपलब्ध करून दयावे व सदर अनुदान बंद होण्याच्या प्रक्रीयेबाबत सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी. नागपूर जि. प. अंतर्गत ५०० सेवानिवृत्त शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरणाची रू. २०० कोटीचे थकीत अनुदान अदा करण्यात यावे. शिक्षकांच्या समस्या निराकरनार्थ जि.प. व पं.स. स्तरावर व्दिमासीक तक्रार निवारण सभेचे आयोजन करावे.
केंद्रप्रमुखंना मासिक प्रवास भत्ता लागु करण्यात यावा. बदली झालेल्या शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे.या प्रश्नांच्या संबंधाने जि.प.महाराष्ट्रासह नागपूर प्रशासनाची भूमिका अधिक सकारात्मक असण्याची गरज आहे. परंतु जि.प.स्तरावर अनुकूल असा प्रतिसाद दिसून येत नाही. संघटनांच्या माध्यमातून वारंवार पत्र व्यवहार करून, भेटी घेऊनही दुर्लक्ष कायम आहे. शिक्षकांना न्याय देण्याच्या बाबतीत जि.प. नागपूर प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. पदोन्नती प्रक्रिया व शिक्षकांचे सेवाविषयक व आर्थिक लाभाच्या मंजुरी बाबतच्या प्रक्रिया वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने जिल्हयातील शिक्षकांच्या संतप्त भावना आहेत.त्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती ने मंगळवार दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे सामुहिक रजा आंदोलन व मोर्चा चे आयोजन केले आहे. शिक्षकांचे उपरोक्त प्रलंबित प्रश्न व समस्या तातडीने निकाली काढण्यात याव्यात. अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. उपरोक्त बाबी संदर्भाने सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल.करिता सकारात्मक प्रतिसाद व अनुकुल निर्णयाचे अपेक्षा व्यक्त करण्यात आली हा मोर्चा प्राथमिक शिक्षक समिती नागपूरचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे,राजकुमारवैद्य म.रा.प्रा.शिक्षक संघ,धनराज बोडे अखिल म.प्रा.शिक्षक संघ,तुषार अंजनकर म.रा.प्रा.शिक्षक सेना,अशुतोष चौधरी म.रा.. जुनी पेन्शन संघटना,प्रवीण फाळके म.रा.प्रा.शिक्षक भारती,प्रमोद लोन्हारे, लीलाधर सोनवाने,उमाकांत अंजनकरम.रा.पद.प्रा.शि.व.कें.प्र.संघटना,म.पुरो.प्रा. शिक्षक संघटना म.रा.प्रा.शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) म.नव.नि. शिक्षक व शिक्षकेत्तर सेना शरद भांडारकर,समीर सुदामे म.जि.प.मागा.शि. संघटना जुगलकिशोर बोरकर जनता शिक्षक महासंघ,शुध्दोधन सोनटक्के म.रा.मागा. शिक्षक संघटना,परसराम गोंडाणे कास्ट्राईब शिक्षक संघटना,नंदकिशोर काळे म.रा.प्रा.शिक्षक महासंघ,योगेश कडू पं. दे. शिक्षक महासंघ,मुरलीधर काळमेघ वि.प्रा.शिक्षक संघ,विलास भोतमांगे म.रा. अपंग कर्म. संघटना,राजु धवड म.प्र.कें. प्र.संघ,राम धोटे म.प्र.शिक्षक काँग्रेससह यांनी केले आहे.