• Total Visitor ( 351362 )
News photo

बिबटया कोंबड्यांच्या शिकारीसाठी गेला अन् खुराड्यात अडकला

Raju tapal July 28, 2025 58

बिबटया कोंबड्यांच्या शिकारीसाठी गेला अन् खुराड्यात अडकला 



तुरळ येथील घटना;



वनविभागाने बिबट्याला पिंजऱ्यात केले जेरबंद 



देवरूख :- कोंबड्यांची शिकार करण्यासाठी खुराड्यात गेलेला बिबट्या हा त्याच खुराड्यात अडकल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील तुरळ सांगडेवाडीत रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मधुकर कुंभार यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात हा बिबट्या अडकला. वनविभागाने या बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने जेरबंद केले. बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.



तुरळ येथील श्री. मधुकर कुंभार यांच्या राहत्या घराचे मागे असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यात बिबट्या शिरल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी परिमंडळ वनअधिकारी संगमेश्वर देवरुख यांना दिली. मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफ रेस्क्यू टीम पिंजरा व इतर साहित्य सह जागेवर जाऊन खात्री करता सदरचा बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकलेला आढळून आला. सदर ठिकाणी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी असलेने पोलीस निरीक्षक संगमेश्वर यांचेशी संपर्क करून गर्दी पांगविणेसाठी पाचारण केले. वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी गर्दी पांगवण्याचे काम केले. तद्नंतर सदर कोंबड्याचे पोल्ट्री फार्मचे सभोवार योग्य ती खबरदारी घेऊन शेडनेट लावले. कोंबड्याचे पोल्ट्रीचे मुख्य दरवाजाचे तोंडावर पिंजरा लावुन वरील भागात लाकडी फळया मारल्या. कोंबड्याचे पोल्ट्री फार्म मध्ये असलेल्या चार कंपार्टमेंट मध्ये फिरत असलेल्या बिबट्याला योग्य ती खबरदारी घेवुन अडीच तासांचे अथक प्रयत्नांनंतर बिबट्यास सुरक्षित रित्या पिंजऱ्यात जेरबंद केले.



सदरवेळी घटनास्थळी परीक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार,परिमंडळ वन अधिकारी श्री न्हाणू गावडे वनरक्षक साखरपा  सहयोग कराडे वनरक्षक फुणगूस आकाश कडुकर वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे वनरक्षक जाकादेवी मती शर्वरी कदम वनरक्षक कांदळवन कक्ष रत्नागिरी, किरण पाचारणे, वनरक्षक आरवली सुरज तेली, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा रणजीत पाटील,  प्राणी मित्र महेश धोत्रे, निसर्गमित्र अनुराग आखाडे, संदीप गुरव संदीप उजगावकर हे उपस्थित होते. तसेच पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक संगमेश्वर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गावित, हेड कॉन्स्टेबल जाधव अरुण वानरे, पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे व खाडे हे उपस्थित होते. तसेच घटनास्थळी सरपंच सरपंच सहदेव सुवरे, उपसभापती दिलीप सावंत,पोलीस पाटील तुरळ वर्षा सुर्वे, पोलीस पाटील हरेकर वाडी संजय धाकटे, पोलीस पाटील गोळवली अनंत पाध्ये, पत्रकार दीपक तुळसणकर व मिलिंद चव्हाण,विचारे,कडवईकर उपस्थित होते.



सदर रेस्क्यू कामी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सदर बिबट्या वन्य प्राण्यास कोणताही विलंब न करता सुरक्षितरीत्या ताब्यात घेतल्या बाबत ग्रामस्थांनी वनविभागाचे कौतुक केले. वन अधिकारी यांनी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. सदर बिबट्याची  पशुवैद्यकीय अधिकारी कडवई बेलोरे यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून घेतले ती मादी असून वय अंदाजे आडीच ते तिन  वर्ष आहे बिबट्या तंदुरुस्त असल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.सदर रेस्क्यू ची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गिरिजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण यांनी केले आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement