• Total Visitor ( 393991 )
News photo

'हिंद-दी-चादर’चा संदेश पोहोचतोय घराघरात 

Raju tapal February 15, 2026 9

'हिंद-दी-चादर’चा संदेश पोहोचतोय घराघरात 



15 हजाराहून अधिक शैक्षणिक संस्थांमधील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग



नवी मुंबई, दि. 15 (विमाका) : ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागमाच्या अनुषंगाने कोंकण विभागातील शिक्षण विभागामार्फत दि. 10 फेब्रुवारी ते 01 मार्च 2026 या कालावधीत व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील एकूण 15 हजार 972 शैक्षणिक संस्थांनी विविध कार्यक्रमांत सहभाग नोंदविला असून, सुमारे 22 लाख 38 हजार 990 विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला आहे. शिक्षण विभागाच्या 14 फेब्रुवारी पर्यंतच्या अहवालानुसार,जिल्हा परिषद व अनुदानित प्राथमिक शाळा,खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये,तसेच आश्रमशाळा,निवासी शाळा आणि वसतिगृहे यामध्ये विविध स्पर्धा,व्याख्याने,निबंध लेखन,वक्तृत्व,चित्रकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हयातील 4 हजार 777 शिक्षण संस्थांमधून 11 लाख 59 हजार 194 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पालघर जिल्हयातील 3 हजार 64 शिक्षण संस्थांमधून 3 लाख 91 हजार 664 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रायगड जिल्हयातील 3 हजार 628 शिक्षण संस्थांमधून 5 लाख 34 हजार 628 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रत्नागिरी जिल्हयातील 2 हजार 871 शिक्षण संस्थांमधून 1 लाख 42 हजार 299 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सिंधुदूर्ग जिल्हयातील 1 हजार 632 शिक्षण संस्थांमधून 11 हजार 205 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. जिल्हा परिषद व अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये सर्वाधिक सहभाग दिसून येत आहे. या शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांनी समागमाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीविषयी माहिती घेत विविध उपक्रमांत भाग घेत आहेत. तसेच खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनीही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित केला आहे. अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये विशेष व्याख्यानमाला, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ‘हिंद-दी-चादर’ या संकल्पनेचा ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ समजावून सांगण्यात येत आहे. काही महाविद्यालयांमध्ये स्वयंसेवकांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. आश्रमशाळा,निवासी शाळा आणि वसतिगृहांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत समागमाचा संदेश पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षण विभागाच्या समन्वयातून उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शैक्षणिक संस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 'हिंद-दी-चादर’ समागमाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या व्यापक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहास,संस्कृती आणि सामाजिक ऐक्याविषयी जागरूकता निर्माण होत असून, कोंकण विभागात या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement