वडगावचा भोंदूबाबा अटकेत;बेलापूरवाल्याला कधी धरणार...
वडगावपान :- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदूबाबा राजेंद्रबापू गडगे(दत्तधाम सरकारवाला) हा गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करीत होता.कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्राने होण्याचे आमिष दाखवणे आणि बरे करणे,निपुत्रिक महिलांना मूल तसेच घरातील समस्या दूर करण्याच्या नावाखाली तो भाविकांकडून ११ हजार ते ५१ हजार रुपयांपर्यंत रकमा उकळण्याचे पाप करत असे. ॲड.रंजना गवांदे यांनी तक्रार दिल्यानंतर संगमनेर पोलिसांनी भोंदूबाबा गडगे व त्याच्या सहकाऱ्यांवर जादूटोणा विरोधी आणि फसवणुकीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान भोंदूबाबा गडगे याला अटक झाल्यानंतर गडगे सारखाच दैवी शक्तीचा दावा करणारा व गोर-गरीब महिला भगिनींची अर्थिक पिळवणूक करणारा बेलापूरचा भोंदूबाबा याच्यावर देखील कारवाई व्हावी अशी आशा जागरुक नागरिकांनी व्यक्त केली आहे.बेलापूरचा भोंदूबाबा तेच करतो आहे जे पोलीसांनी अटक केलेला भोंदूबाबा करत होता.मग एकाला अटक व एक मोकाट हा न्याय का ? असा सवाल देखील एका गावातील हिंदुत्ववादी नेत्याने उपस्थित केला आहे.