• Total Visitor ( 84489 )

''बीजेपी आया हैं, अब मराठी नहीं..

Raju tapal December 05, 2024 41

''बीजेपी आया हैं, अब मराठी नहीं..
मुंबई मारवाडीयों का'' दुकानदाराने महिलेला सुनावलं, 
गुन्हा दाखल

मुंबई:- राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होत आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी शपथ घेत आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये भव्य-दिव्य शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.त्यातच मराठीच्या मुद्द्यावरुन एक घटना घडली आहे.

गिरगावातील एका दुकानदाराने महिलेच्या मराठी बोलण्यावर आक्षेप घेतला होता. "बीजेपी आया हैं, अब मराठीमें बात नाही करनेका, मारवाडी मे बात करनेका.. अब मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का" असं कथित विधान दुकानदाराने केलं होतं.

दुकानदाराच्या या विधानाप्रकरणी मनसे आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. पोलिसांनी मनसेच्याच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गिरगावातील मराठी विरुद्ध मारवाडी वादाप्रकरणी व्हीपी रोड पोलिसांचा मनमानीपणा सुरु असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

दुकानचालकाला दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुकानदाराच्या कथित वक्तव्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला एकाही जागेवर यश मिळवता आलेलं नाही. तर महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत २३० जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीची वाताहत झालेली बघायला मिळाली. केवळ ४६ जागांवर महाविकास आघाडी टिकू शकली.

Share This

titwala-news

Advertisement