• Total Visitor ( 435821 )
News photo

अंगणवाड्यांमध्ये रचली जाणार 'आधारशिला'

Raju tapal May 21, 2025 122

अंगणवाड्यांमध्ये रचली जाणार 'आधारशिला'



यंदापासून नवा अभ्यासक्रम, राज्यभर होणार अंमलबजावणी



अमरावती :- राज्यातील अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वर्षे वयाच्या बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने 'आधारशिला' या नावाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.

आधारशिला अभ्यासक्रमाची रचना केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने विकसित केलेला हा अभ्यासक्रम राज्यात अंमलात आणण्यात येणार आहे. 'आधारशिला बालवाटिका-१', 'आधारशिला बालवाटिका-२' आणि 'आधारशिला बालवाटिका-३' या नावाने हा अभ्यासक्रम राबविला जाईल. या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका, प्रशिक्षण साहित्य व अनुषंगिक साहित्य अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षणाच्यावेळी उपलब्ध करून देण्यात येईल. बालकांना पहिल्या वर्गाकरिता शैक्षणिकदृष्ट्या तयार करणे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट राहणार आहे.



या साहित्याच्या आधारे

अंगणवाड्यांमध्ये अभ्यासक्रमाची वर्षभर अंमलबजावणी करण्यात येईल. त्यानंतर या साहित्याच्या उपयोगिता व परिणामकारतेचे मूल्यमापन केले जाईल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांमार्फत हे मूल्यमापन करण्यात येणार आहे.त्यानंतर या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. याकरिता अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

महिला व बालविकास विभागाच्यावतीने राज्यात सुमारे १,१०,६३१ अंगणवाडी केंद्रे चालविण्यात येतात. यामध्ये, ३ ते ६ वयोगटातील सुमारे ३० लाख बालकांचा समावेश आहे. एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य व पोषण शिक्षण, संदर्भ सेवा इत्यादी सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

===================

नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी अशी



राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार २०२५-२६ पहिली इयत्ता, २०२६-२७मध्ये २, ३, ४ आणि ६, २०२७-२८मध्ये ५, ७, ९ आणि ११ तर २०२८-२९मध्ये ८, १० आणि १२ या इयत्तांसाठी अंमलबजावणी होईल.

=============


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement