• Total Visitor ( 515632 )
News photo

"५८ व्या युवक महोत्सवाची गोवेली महाविद्यालयाला चॅम्पियनशिप"

Raju Tapal publisher May 16, 2026 95

"५८ व्या युवक महोत्सवाची गोवेली महाविद्यालयाला चॅम्पियनशिप"



मुंबई:- विद्यापीठाच्या ५८ व्या युवक महोत्सवात गोवेली महाविद्यालयाने विजेतेपद पटकावून चॅम्पियनशिपवर नाव कोरल्याने विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित ५८ व्या युवक महोत्सव २०२६ मध्ये जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली या महाविद्यालयाने सुवर्णमयी कामगिरी केली आहे.या महोत्सवातील झोन क्र. ०६ (ठाणे-पालघर ग्रामीण) मध्ये महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी गायन,वादन,अभिनय,नृत्य,

मेहंदी,वक्तृत्व यांमध्ये आपल्या उत्कृष्ट कलागुणांचे सादरीकरण करत 'मुंबई विद्यापीठाच्या चॅम्पियनशिपवर' नाव' कोरले आहे. महाविद्यालयाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.महाविद्यालयाला मिळालेले हे यश म्हणजे विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम आणि संस्थेच्या पाठीशी असलेल्या भक्कम मार्गदर्शनाचा परिपाक आहे. जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रविंद्र घोडविंदे सर यांच्या कल्पक प्रेरणेतून आणि संस्थेचे संचालक प्रशांत घोडविंदे व प्राचार्य डॉ. अशोक वाघ सर यांचे कुशल मार्गदर्शन या यशासाठी अत्यंत मोलाचे ठरले. गोवेली महाविद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. या युवक महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये गोवेली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दर्जेदार सादरीकरणाने परीक्षकांची आणि प्रेक्षकांची मने जिंकली.सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.सतीश लकडे,उपप्राचार्य.प्रा.हरेंद्र सोष्टे,सर्व प्राध्यापक आणि कर्मयोगी या सर्वांनी घेतलेली मेहनत आणि नियोजनामुळेच महाविद्यालयाला मानाची चॅम्पियनशिप आपल्या नावावर करता आली.झोनमध्ये अव्वल स्थान पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे,त्यांना घडवणाऱ्या मार्गदर्शकांचे आणि सांस्कृतिक विभागाचे तसेच ठाणे-पालघर झोनचे जिल्हा समन्वयक डॉ.जयश्री कवठेकर आणि सहसमन्वयक डॉ.प्रकाश धुमाळ याचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रविंद्र घोडविंदे सर यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आहेत.करण्यात आले आहे.या यशात मोलाचे सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाबद्दल संस्थेने कृतज्ञता व्यक्त केली असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement