• Total Visitor ( 430553 )
News photo

कार्ला एकविरा गडावर शनिवारी 'एक दिवस कायस्थांचा' 

Raju tapal November 25, 2025 54

कार्ला एकविरा गडावर शनिवारी 'एक दिवस कायस्थांचा' 



देशभरातील सीकेपी एकविरा देवीच्या दर्शनाला...



ठाणे:- लोणावळा,कार्ला येथील एकविरा देवीच्या गडावर`एक दिवस कायस्थांचा' सोहळा शनिवार दि. २९ नोव्हेंबर रोजी होणार असून देशभरातील चांद्रसेनिय कायस्थ प्रभू (सीकेपी) मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. गेली ९ वर्षे सीकेपी समाज हा लोकप्रिय सोहळा आयोजित करीत आहे.लोणावळा कार्ला येथील श्री एकविरा देवी सीकेपी समाजाची कुलदेवता म्हणून ओळखली जाते. १६ व्या शतकापासून कार्ला गडावर सीकेपी समाजाचा राबता असल्याचा इतिहास आहे. २०१७ पासून कार्ला येथील एकविरा देवीचा उत्सव साजरा करणे सुरु झाले. गेल्या नऊ वर्षांची परंपरा यावर्षीही सुरु असून 'एक दिवस कायस्थांचा' उत्सव शनिवार दि. २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता सीकेपी ज्ञातीतर्फे एकविरा आईचा अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर  ६ वा. एकविरा गडाकडे पालखी रवाना होणार आहे. नंतरचे सर्व कार्यक्रम गडाच्या पायथ्याशी असलेल्या एकविरा ड्रिम व्हिला येथे होणार आहे. अभिषेक,एकविरा आई यज्ञ,गोंधळ व महाआरती,त्यानंतर खास सीकेपी पध्दतीचा शाकाहारी व मांसाहारी महाप्रसाद होणार आहे. सदरचा महाप्रसाद उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्या सहकार्याने होणार आहे. प्रारंभी होमहवन होणार असून गोंधळ,महाआरती, मान्यवरांचे सत्कार,महाप्रसाद अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवासाठी पुणे, महाड,कल्याण,डोंबिवली,बदलापूर,भिवंडी,ठाणे,बोरीवली इ. ठिकाणाहून विशेष बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उत्सवाचे प्रमुख आयोजक तुषार राजे,तसेच रघुवीर देशमुख,विकास देशमुख,जयदिप कोरडे,निलेश गुप्ते,स्वप्निल प्रधान,अशोक कुळकर्णी,सागरिका कर्णिक, अजंली प्रधान आदींनी केले आहे. चौकट-'कायस्थांची एकविरा' विश्वस्त संस्थेची स्थापना २०१७ पासुन गेली नऊ वर्षे `एक दिवस कायस्थांचा' या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढत आहे. या कार्यक्रमासाठी कार्ला गडावर देश विदेशातील सीकेपी मंडळी आवर्जुन उपस्थित राहतात. तेव्हा,एकविरा देवी मंदिर परिसरात सीकेपी समाजाची वास्तु असावी असा ज्ञाती बांधवांचा मनोदय असून त्यादृष्टीने यावर्षी सुरुवात होणार आहे. त्याकरिता यंदा प्रथमच `कायस्थांची एकविरा विश्वस्त संस्थेची' स्थापना करण्यात आल्याचे तुषार राजे यांनी सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement