• Total Visitor ( 701624 )
News photo

निमगाव म्हाळुंगी येथून १४ वर्षीय मुलगी बेपत्ता 

Raju tapal January 11, 2026 95

निमगाव म्हाळुंगी येथून १४ वर्षीय मुलगी बेपत्ता 

      

शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील १४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. निमगाव म्हाळुंगी येथे कामानिमित्त आलेल्या पूजा पवार यांची १४ वर्षीय मुलगी निर्जरा‌ रात्रीच्या सुमारास घरातून बाहेर गेली.बराच वेळ ती घरी न आल्याने तिच्या कुटूंबियांनी तिचा आजूबाजूला तसेच नातेवाईक व मैत्रिणीकडे शोध घेतला ‌मात्र ती आढळून आली नाही.



निर्जरा‌ पवार या बेपत्ता मुलीचे वर्णन पुढीलप्रमाणे:-  उंची ५ फूट,रंगाने सावळी,काळे केस,चेहरा गोल,डोळ्यात तिरळी,अंगात गुलाबी व चाॅकलेटी ड्रेस .

मुलीची आई पुजा जिनेश पवार रा‌.निमगाव म्हाळूंगी यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास शिक्रापूर पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलीसांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026