ट्रॅक्टरच्या धशात अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू
शिरूर:- ट्रॅक्टरच्या धशात अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील वरूडे येथील शेतात घडली.
शिवम सत्यवान दरवडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून समजलेल्या माहितीनुसार,शिवम हा जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेला होता.ट्रॅक्टर शेतात आदळल्याने शिवम खाली फेकला गेला..ट्रॅक्टरच्या धशात अडकला.आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा करत तातडीने त्याला बाहेर काढून शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुण्याला नेत असताना वाटेतच त्याचा दूर्दैवी मृत्यू झाला. किसन गेनभाऊ तांबे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस हवालदार संदीप बनकर पुढील तपास करत आहेत.