• Total Visitor ( 430222 )
News photo

कोकण परीक्षेत्रातील 20 वा पोलीस कर्तव्य मेळावा

Raju tapal July 12, 2025 60

कोकण परीक्षेत्रातील 20 वा पोलीस कर्तव्य मेळावा

सिंधुदुर्ग ठरला गुन्हे फोटोग्राफी चँम्पीयनशीप ट्राँफीचा मानकरी



सिंधुदुर्ग पोलिसांनी पटकाविली 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कास्यपदकांसह 16 पदके



कोकण परीक्षेत्र 20 वा पोलीस कर्तव्य मेळावा 2025 संपन्न



सिंधुदुर्ग :- कोकण परीक्षेत्रीय पोलीस फोटोग्राफी चॅम्पियन शिप फोटोग्राफीमध्ये सिंधुदुर्ग पोलीस दलाने मानाची ट्राँफी पटकाविली आहे.  सिंधुदुर्ग पोलीस दलास या  स्पर्धेत सुवर्ण-4, रौप्य-4 व कास्य-8 अशी एकूण 16 पदके पटकावित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.



ठाणे येथे कोकण परीक्षेत्रातील 5 जिल्ह्याकरिता झालेल्या, कोकण परीक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळावा-2025 म्हणजे गुन्हे तपासाच्या विविध स्पर्धा व प्रात्यक्षिक परीक्षात  सिंधुदुर्गच्या पोलीस दलाने 4 सुवर्ण,4 रौप्य आणि 8 कास्य पदके पटकावली.सदर स्पर्धा 8 ते 10 जुलै कालावधीत ठाणे येथे पार पडली.या स्पर्धात सिधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या  मार्गदर्शनाखाली कोकण परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार असे 20 स्पर्धक सहभागी झाले होते.

 

ठाणे येथे Scientific aid to investigation compitition अंतर्गत कोकण परीक्षेत्रातील 5 जिल्ह्याकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धात Labelling and Packaging taste & Officer photography या प्रकारात पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके, Forensic science writing test &,Officer photography या प्रकारात महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील यांनी सुवर्ण व कांस्यपदक, Observation taste मध्ये प्रमोद काळसेकर यांनी कास्यपदक, Observation taste & Potret Taste मध्ये जावीद मुल्ला यांनी दोन रौप्य पदके, Police photography & videography taste मध्ये संतोष सावंत यांनी सुवर्ण व कास्यपदक, Anti Sabotage Check competition मध्ये गिरीश तळेकर यांनी सुवर्णपदक, भालचंद्र दाभोलकर यांनी कास्यपदक, निखिल कुऱ्हाडे यांनी 2 कास्यपदके, Computer awareness competition मध्ये JAVA NET सांघिकमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल निकिता परब व पोलीस कॉन्स्टेबल योगेश साटम यांनी कास्यपदक पटकावले.



कोकण परीक्षेत्रातील 5 जिल्ह्याकरिता झालेल्या, कोकण परीक्षेत्र पोलीस कर्तव्य मेळावा-2025 म्हणजे गुन्हे तपासाच्या विविध स्पर्धा व प्रात्यक्षिक परीक्षेतील सुवर्ण, रौप्य व कास्य पदक वितरण सोहळा शुक्रवार दि.11 जुलै रोजी कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement