• Total Visitor ( 429590 )
News photo

शिक्रापूर येथे आयोजित केलेल्या तपासणी शिबिरात २५० ग्रामस्थांना लाभ        

Raju tapal August 20, 2025 79

शिक्रापूर येथे आयोजित केलेल्या तपासणी शिबिरात २५० ग्रामस्थांना लाभ        



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- जेष्ठ नागरिक संघ, धन्वंतरी डिस्ट्रिब्युटर्स प्रा.लि.यांच्यावतीने शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे आयोजित केलेल्या हाडांची ठिसूळता तपासणी,मोफत डोळे तपासणी शिबिराचा २५० ग्रामस्थांनी लाभ घेतला.

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील भैरवनाथ मंदीरात मंगळवार दिनांक १९/०८/२०२५ रोजी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती व एच.व्ही.देसाई डोळ्यांचे हॉस्पिटल मोहम्मद वाडी हडपसर या दोन्हींच्या वतीने ज्येष्ठांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड व शिक्रापूर गावचे सरपंच रमेशराव गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

या शिबिरात जेष्ठ नागरिकांची हाडांचा ठिसूळपणा,डोळ्यांचे मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.दिनकर कळमकर, खजिनदार अर्जुनभाऊ शिर्के सचिव अशोक कुदळे व भैरवनाथ मंदिराचे अध्यक्ष राजाभाऊ मांढरे उपाध्यक्ष उत्तमराव गायकवाड तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी बाळासाहेब शेंडे, वसंतराव तांबे,निवृत्ती जकाते,प्रभाकर मुसळे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाला ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात जवळजवळ २५० हून अधिक ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी मचे यांनी केले. सेवानिवृत्त प्रा.बाबुराव साकोरे यांनी उपस्थित सर्वांचे मनापासुन आभार मानले.

      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement