• Total Visitor ( 492219 )
News photo

३० दिवसांची मुदत;प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित

Raju Tapal publisher April 22, 2026 29

३० दिवसांची मुदत;प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित

शिङी :- प्रतिनिधी राहुल फुंदे...शिर्डी येथे सुरू असलेले उपोषण नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या मध्यस्थीने अखेर स्थगित करण्यात आले. प्रशासनाने मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देत,एक महिन्याच्या आत ठोस कारवाई करू असे लेखी आश्वासन दिले. हे पत्र छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे जालिंदर बाबा असणे,संदीप वाघ,अनिल मलदोडे,उद्धव कटारे,दीपक पाटील,प्रदीप कोते,कुणाल धिवर,मंगेश शिंदे,आदेश पांगरकर, दीपक जाधव तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिन आरणे,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नानकजी सावंत,रे,मनोज जाधव,भागिनाथ जाधव,सुशांत कुडदे,शाहू रोकडे,अविनाश ससाने आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement