कंपनीतील काॅपर ट्यूबचे ६५ बंडल लंपास
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील करडे येथील एस व्ही एस रेफकाॅम प्रा.लिमिटेड कंपनीच्या युनिट नंबर २ मधून अज्ञात चोरट्यांनी काॅपर ट्यूबचे ६५ बंडल लंपास केले.
नामदेव महादू गाडेकर वय -३७ रा.मराठानगर केडगाव जि.अहिल्यानगर यांनी या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
२५ सप्टेंबर संध्याकाळी ७ ते २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेआठ दरम्यान चोरट्यांनी कंपनी युनिटच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून प्रवेश करून आतमध्ये ठेवलेले काॅपर ट्यूबचे २५,१२४ /- रूपये किंमतीचे ६५ बंडल चोरून नेले. प्रत्येक बंडल २२ किलो वजनाचा असून एकूण १६ लाख ३३ हजार ६० रूपये किंमतीचा माल चोरीस गेला.
रजिस्टर नंबर ६८३ /२०२५ कलम बी एन एस ३०५ प्रमाणे शिरूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक बनकर पुढील तपास करत आहेत.