नवोदय निवड चाचणीसाठी अमरावती जिल्ह्यातून ७ हजार ८४ विद्यार्थी
जिल्हा परिषद अमरावती शिक्षण विभागाचा उपक्रम
अमरावती:- जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणी परीक्षेसाठी अमरावती जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमधून एकूण ७ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये मराठी माध्यमातील ६ हजार ३३ विद्यार्थी,तर उर्दू माध्यमातील १ हजार ५१ विद्यार्थी सहभागी झाले होते.ही निवड चाचणी परीक्षा ४सप्टेंबरला प्रत्येक केंद्रा अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.या निवड चाचणी मधुन ५००विद्यार्थांची गुणवत्तेनुसार निवड होणार असुन.त्यांची पुन्हा निवड चाचणी तालुकास्तरावर होणार असुन त्या मधुन १४पंचायत समिती मधुन ८०विद्यार्थांची निवड करण्यात येणार आहे.या विद्यार्थांचे जिल्हास्तरावर निवासी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.अश्या प्रकारचे नवोदय परीक्षेच्या करीता चाचणी परीक्षा व शिबिराचे आयोजन करण्याची पहीलीच वेळ आहे.या मधुन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांची स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी होणार आहे.ही संकल्पना अमरावती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी(भा.प्र.से.) यांची आहे. अचलपूर,अमरावती,अंजनगाव सुर्जी,भातकुली,चांदूर बाजार,चांदूर रेल्वे,चिखलदरा,दर्यापूर,धामणगाव रेल्वे,धारणी,मोर्शी,नांदगाव खंडेश्वर तिवसा आणि वरूड या १४ पंचायत समित्यांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती.त्यांची निवड चाचणी नुकतीच पार पडली. नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता असून,निवड चाचणीसाठी विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली आहे. परीक्षा यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिक्षण विभाग यंत्रणेकडून आवश्यक नियोजन करण्यात आले होते. अशी माहीती प्राथमिक शिक्षणाधिकारी सिंध्देश्वर काळुसे व शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण खांडेकर यांनी दिली आहे.