कंटेनरच्या धडकेत शिळकवाडी येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळे जगताप येथे शिक्रापूर - चाकण रस्त्यावर बुधवारी दि.१८ जूनला घडली.
पांडूरंग दगडू साकोरे वय - ३४ रा.शिळकवाडी,केंदूर ता.शिरूर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून निवृत्ती महादू साकोरे यांनी या अपघाताची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली.
साकोरे हे दुचाकी क्रमांक एम एच १२ क्यू पी ९१९३ वरून शिक्रापूर - चाकण रस्त्याने जात असताना पिंपळे जगताप गावच्या कमानी समोर एम एच ४० ए के ६६३२ क्रमांकाच्या कंटेनर ची त्यांच्या दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार पांडुरंग साकोरे यांचा मृत्यू झाला.
कंटेनर चालक अखिलेश सुरेशकुमार वय - ३० रा.भरतपूर,उत्तरप्रदेश याच्याविरूद्ध शिक्रापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.