• Total Visitor ( 449630 )
News photo

रिपाई आठवले पक्षात मोठ्या संख्येने तरूण वर्ग सामील 

Raju tapal December 11, 2025 71

रिपाई आठवले पक्षात मोठ्या संख्येने तरूण वर्ग सामील 

राजू टपाल.

टिटवाळा:- रिपाई अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्य मंञी रामदास आठवले यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात युवक वर्ग पक्षात सामिल होत आहेत.यावेळी ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेश बारशिंगे यांच्या मान्यतेने रिपाई ठाणे जिल्हा ग्रामीण पक्षाची महत्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी हाॅटेल निसर्ग भिंवडी बायपास येथे दुपारी 4.00 वाजता संपन्न  झाली. सदरील बैठक रिपाई ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. या बैठकीसाठी रिपाई ठाणे जिल्हा पक्षाचे जिल्हा पदाधिकारी सह,जिल्हा महिला आघाडी पदाधिकारी,जिल्हा युवक आघाडी पदाधिकारी तसेच ठाणे जिल्हा अधिनस्त तालुकाध्यक्ष,सरचिटणीस व शहर अध्यक्ष,सरचिटणीस तालुका युवक आघाडी प्रतिनिधी उपस्थितीत होते. सदरील बैठक अत्यंत महत्वपूर्ण विषयावर झाली. बैठकीत सर्वानुमते चर्चा होवून उपस्थितांनी एकमताने ठराव पारित करून त्यास मंजूरी देण्यात आली. यावेळी रिपाई जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांच्या पुर्व परवानगी शिवाय अन्य कोणत्याही पदाधिकारी यांनी बैठक बोलावू नये. मात्र बैठक लावण्यासाठी शिफारस करू शकतात. पक्षात शिस्त असणे आवश्यक आहे. असे निदर्शनास आल्यास त्या पदाधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात येईल. ठाणे जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष हरिष कांबळे,व त्यांचे युवक आघाडी कल्याण तालुकाध्यक्ष मिलींद भोईर,व बेसीक आघाडी जिल्हा सदस्य भगवान पवार यांनी पक्ष विरोधी वागणूक करून पक्षाच्या विरोधी अन्य राजकिय पार्टीत प्रवेश केल्याने व तिघेही पदाधिकारी निष्क्रिय असल्याने हरिष कांबळे,मिलींद भोईर व भगवान पवार यांना त्यांच्या कार्यरत पदावरून निलंबित  करण्यात येत आहे. तसेच रिपाई आठवले पक्षातून हरिष कांबळे,मिलींद भोईर,भगवान पवार यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. नवीन कार्यकर्ते रिपाई आठवले भिंवडी तालुका महापोली,अंबाडी येथून पंडीत गायकवाड यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रमुख रामदास आठवले यांच्यावर विश्वास ठेवून तरुण कार्यकर्ते यांनी रिपाई पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांनी त्यांचे पक्षाची निळीपट्टी घालून स्वागत केले. व पक्षाचे सदस्य करून घेवून पंडीत गायकवाड महापोली यांना ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष या पदावर घोषित करण्यात आले. तसेच सुमित संजय जाधव सोनाले यास रिपाई वाहतुक आघाडी अध्यक्ष जिल्हा ठाणे या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तसेच अन्य सदस्यांना पक्षात प्रवेश देऊन पक्षात स्वागत करण्यात आले. येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत उभे राहणाऱ्या ईच्छुक उमेदवारांची यादी तालुकाध्यक्ष यांनी तयार करून  ठाणे जिल्हा कमिटी कडे विनाविलंब सादर करावी. आयत्यावेळेस अध्यक्ष यांच्या परवानगीने  उपस्थितीत तालुका पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्हयात चार सरचिटणीस कशासाठी..? पक्षाची कामे कोणीही करीत नाहीत, या बैठकीत चर्चा करून चार जिल्हासरचिटणीस ऐवजी दोनच जिल्हा सरचिटणीस ठेवण्यात यावे. तसा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. त्यापैकी प्रथम प्राधान्याने जिल्हा सरचिटणीस बाळ भालेराव,जिल्हा सरचिटणीस प्रा.शरदचंद्र सोनावणे यांना मान्यता देण्यात आली. अन्य दोन यापूर्वीचे सरचिटणीस प्रविण गायकवाड,प्रमोद जाधव यांना  सरचिटणीस या पदावरून कमी करून अन्य पदावर ठेवण्यात आले. यापुढे प्रविण गायकवाड व प्रमोद जाधव यांनी सरचिटणीस या पदाचा वापर करू नये. असा बैठकीत ठराव मंजुर करण्यात आला. जिल्हा कार्यकारिणीच्या होणाऱ्या बैठकीत जे पदाधिकारी सलग तीन वेळा बैठकीला गैरहजर राहतील त्या पदाधिकारी यास त्या पदावरून कमी करून अन्य पक्षाचे जोमाने काम करणाऱ्या पदाधिकारी यास सामावून घेणे. यापुढे पक्षाचा पञव्यवहार करतांना जिल्हाध्यक्ष व जिल्हासरचिटणीस यांच्या स्वाक्षरीनेच पुढील पञव्यहार करण्यात यावा. निवडणूका व अन्य महत्वपूर्ण बाबीसाठी पञव्यहार करतेवेळी मिञ पक्षाच्या प्रमुखांना भेटीसाठी जिल्हा कोअर कमिटी,महिला आघाडी दोन प्रतीनिधी युवक आघाडी दोन प्रतीनिधी तसेच त्या त्या तालुक्यातील दोन प्रतीनिधी अशी संयुक्तिक टिम तयार करून भेटी घेणे व पुढील कारवाई करावी. सदरील बैठकीत जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, यांनी सांगितले कि सर्वानी एकसंघ राहून पक्षाचे काम करूया व पक्ष मजबूत करूया असे आवाहन करण्यात आले. युवक आघाडी जिल्हाध्यक्ष तेजस जाधव यांनी युवकांना मार्गदर्शन करून आपण सर्व फादर बाॅडी सोबत राहून त्यांचे मार्गदर्शन घेऊन व सोबत राहू व पक्ष वाढवू महिला विभागीय अध्यक्षा संगिता गायकवाड यांनी कोनगांव पंचायत समिती राखीव मतदारसंघातून लढण्यास ईच्छुक आहे. असे सांगून आपण सर्वांनीच मला साथ द्यावी. असे आवाहन केले. सदरील बैठकीस उपस्थितांचे आभार संजय भालेराव यांनी मानले.या बैठकीस जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड,जिल्हा सरचिटणीस बाळ भालेराव,युवक आघाडी जिल्हाध्यक्ष तेजस जाधव,युवक आघाडी सरचिटणीस संजय भालेराव,बदलापूर शहर सरचिटणीस राकेश गरूड,जिल्हा संघटक सुदाम संगारे,जिल्हा उपाध्यक्ष बी.के.गायकवाड,महिला आघाडी विभागीय जिल्हा अध्यक्षा संगीता गायकवाड,कल्याण तालुकाध्यक्ष कुणाल दोंदे, भिंवडी तालुका सरचिटणीस नारायण जाधव,उपाध्यक्ष योगेश भोईर,युवक आघाडी तालुकाध्यक्ष मुरबाड सतीश गायकवाड,युवक प्रतिनिधि अनुज जाधव,अक्षय गायकवाड,मल्लेश साईनाथ,प्रेम गायकवाड इत्यादी महापोली गाव व परिसराच्या गावातील एकूण नव्याने 10 सदस्य व महिला प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड व जिल्हा सरचिटणीस बाळ भालेराव यांनी दिली.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement