• Total Visitor ( 481867 )
News photo

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणा-या आरोपींना अटक

Raju tapal April 08, 2025 75

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणा-या आरोपींना अटक ; शिरूर पोलीसांची कामगिरी 

     

शिरूर :- महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणा-या आरोपींना शिरूर पोलीसांनी अटक केली आहे.

गणेश सुनील गायकवाड वय -२१ (रा‌.सारसनगर ,शांतीनगर,सोलापूर रोड,अहिल्यानगर), करण नरसी वाघेला वय - २४(रा‌.संजयनगर काटवन  खंडोबा ,स्टेशन रोड,अहिल्या नगर)अशी अटक केलेल्या आरोपी़ंंची नावे असून आरोपींचा तिसरा साथीदार साजीद सलीम शेख (रा‌.अहिल्यानगर‌) हा सध्या फरार आहे.

फरार आरोपी साजीद शेख याच्यासह गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी शिरूर पोलीसांना दिली.

तपासादरम्यान चोरीस गेलेले दागिने आरोपी साजिद शेख याने त्यांचे वडील आजारी असल्याचे कारण देत एका स्थानिक सोनाराकडे ठेवले होते.त्या सोनाराने दागिने पोलीसांना सुपूर्द केल्याने ते जप्त करण्यात आले.

२६ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादी महिला रात्रीच्या वेळी हनूमान मंदीरा जवळून जुन्या हायवे वरील गणेश डेअरी समोरून पायी जात असताना  स्कुटी वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे २७,८४० रूपये किंमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी केली होती.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला होता.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement