• Total Visitor ( 511429 )
News photo

पश्चिम बंगालमध्ये ‘अधिकारी पर्व’ - सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Raju Tapal publisher May 09, 2026 20

पश्चिम बंगालमध्ये ‘अधिकारी पर्व’ - सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ



कोलकत्ता:- नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमतासह ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर आज सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रवी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध राज्यांतील भाजपा आणि एनडीएचे मुख्यमंत्री आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर बंगालमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले असून,हा सोहळा अत्यंत ऐतिहासिक ठरला. या दिमाखदार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement