• Total Visitor ( 704243 )
News photo

टिटवाळ्यातील आदिती दिक्षित हिची हँडीक्राफ्ट विभागातर्फे प्रदर्शनासाठी निवड 

Raju tapal November 19, 2025 138

टिटवाळ्यातील आदिती दिक्षित हिची हँडीक्राफ्ट विभागातर्फे प्रदर्शनासाठी निवड 

राजू टपाल. 

टिटवाळा :- दिल्लीतील प्रगती मैदान येथे ४४ व्या भारत आांतरराष्ट्रीय व्यापार मेलाचे आयोजन करण्यात आलेले असून यात टिटवाळ्यातील आर्टिस्ट कुमारी आदिती माधव दीक्षित हिच्या स्टुडीओ विरासत या स्टार्टप ची वस्त्रोद्योग मंत्रालय हँडीक्राफ्ट विभागातर्फे या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. १४ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या या प्रदर्शनास आजपर्यंत अनेक मान्यवरांनी अदितीच्या स्टॉलला भेट देऊन तिच्या टिमच्या कामाचे कौतुक केले आहे. या मान्यवरांमध्ये दिल्लीतील आयकर विभागाचे डेप्युटी कमीशनर डॉ. श्रीधर,डेवलपमेंट कमिशनर हँडीक्राफ्ट विभागाच्या अर्मीत राज तसेच डेवलपमेंट कमिशनर हँडलूम डॉ. बिना इत्यादींचा समावेश आहे. दिल्लीकरांनी तिच्या या स्टॉलला भरघोस प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक मिडीया हाऊसने हा स्टॉल कव्हर केला आहे. यात सीएनबीसी आवाज चॅनेलचे मुख्य प्रतिनिधी रोहन सिंह यांचाही सामावेश आहे. २७ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या ह्या भारतातील एका अत्यंत महत्वाच्या प्रदर्शनात टिटवाळ्यातील आदिती दीक्षित हिचा सहभाग हा मांडा टिटवाळकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026