• Total Visitor ( 482852 )
News photo

विद्यूतरोहित्राला धोकादायक एअर वाॅल

Raju Tapal publisher April 15, 2026 22

विद्यूतरोहित्राला धोकादायक एअर वाॅल

        

शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावाच्या कडेला बसविण्यात आलेल्या विद्यूतरोहित्राशेजारी पाईपलाईनमधून हवा निघण्यासाठी एअरवाॅल बसविण्यात आलेला आहे.

हा एअरवाॅल विद्यूतरोहित्राच्या अगदी  जवळच बसविण्यात आलेला आहे. एअरवाॅलमधून निघणारे पाणी जोरदार वा-यामुळे विद्यूतरोहित्राला असलेल्या पॅनेलबाॅक्सवर पडून धोका होण्याची अधिकाधिक शक्यता आहे.

विद्यूतरोहित्राजवळच असलेल्या कोंढापुरी येथील पाझर तलावातून श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती तसेच शिक्रापूर गावातील नागरिकांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविण्यात आलेली आहे. एअरवाॅलमधून निघणारे पाणी,जोरदार वा-यामुळे उडणारे पाणी,विद्यूतरोहित्राच्या पॅनेलबाॅक्सवर उडून संभाव्य धोका होवू नये यासाठी तज्ज्ञांनी पाहणी करणे अतिशय गरजेचे आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement