शिक्रापूर येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह
तळेगाव ढमढेरे:- ज्ञानवृद्धी,सद्गुणांची जोपासना,सद्बुद्धी,भक्तीची आवड निर्माण निर्माण होण्याच्या उद्देशाने शिक्रापूर येथील ग्रामस्थांनी आज दि.२८ मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर प्रांगणात आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात कलशपुजन करून हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरूवात केली जाणार आहे. अखंड वीणा,पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,सकाळी ११ ते १२ गाथा भजन,सायंकाळी ५ ते ६ प्रवचन,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ,रात्री ९ ते ११ कीर्तन, रात्री १२ नंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम हरिनाम सप्ताह सोहळ्यात पार पडणार आहेत. युवा कीर्तनकार ह.भ.प.आदिनाथ महाराज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणा-या हरिनाम सप्ताह सोहळ्यात ह.भ.प.चिंतामणीमहाराज तारू,सागर महाराज शिर्के,श्रीनिवास महाराज जगताप,अनिताताई महाराज जाधव,बाळशीराम महाराज मिंडे, विलास महाराज वाघ,प्राध्यापक नवनाथ महाराज माशेरे या कीर्तनकारांचे कीर्तन,ह.भ.प.शरदमहाराज शास्त्री,राजेंद्र महाराज गरूड,कैलास महाराज कापरे,काळूराम महाराज भुजबळ,सुरेखा ताई महाराज गायकवाड,स्वराज महाराज खैरे,पांडूरंग महाराज मंचरकर या प्रवचनकारांचे प्रवचन हरिनाम सप्ताह सोहळ्यात पार पडणार असल्याचे शिक्रापूर येथील ग्रामस्थांनी सांगितले. शिक्रापूर येथील संत तुकाराम भजनी मंडळ,गजलक्ष्मी महिला भजनी मंडळ,स्वरांजली महिला भजनी मंडळ,विठ्ठल रूक्मिणी भजनी मंडळ बजरंगवाडी,कानिफनाथ भजनी मंडळ माळ वस्ती शिक्रापूर,शिव शंभो भजनी मंडळ,वडजाई माता भजनी मंडळ वाबळेवाडी,केरोबा भजनी मंडळ केरोबामळा,कल्पवृक्ष महिला भजनी मंडळ, धनलक्ष्मी महिला भजनी मंडळ शिक्रापूर या भजनी मंडळाचा हरिजागर सप्ताह सोहळ्यात पार पडणार आहे असे शिक्रापूर ग्रामस्थांनी सांगितले.
पवार,सासवडे,खेडकर,शिर्के,भुजबळ,राऊत,मांढरे,जगताप,कळमकर,विरोळे,काळे,दाते,गायकवाड,मचेसर या ग्रामस्थ विणेक-यांची साथ हरिनाम सप्ताह सोहळ्यास लाभणार असून शनिवार दि.४ एप्रिलला सकाळी ९ ते ११ यावेळेत ह.भ.प.माधव महाराज रसाळ यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दुपारी १२ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे आयोजन शिक्रापूर ग्रामस्थांनी केले आहे.