• Total Visitor ( 704063 )
News photo

चिंचोली मोराची येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन 

Raju tapal November 08, 2025 278

चिंचोली मोराची येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन 

          

शिक्रापूर (प्रतिनिधी):- शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथील ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे.गुरूवार दि.२० नोव्हेंबर पासून सुरू होणा-या सप्ताह सोहळ्यात काकडा भजन,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,प्रवचन,हरिपाठ,हरिकिर्तन,हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत अशी माहिती चिंचोली मोराची ग्रामविकास फाऊंडेशनचे सचिव दादासाहेब उर्फ संतोष उकिर्डे‌ यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. ह.भ.प.करंडे‌ महाराज,ह.भ.प.केरूभाऊ महाराज मांदळे,ह.भ.प.वसंत महाराज भोसले,ह.भ.प.कैलास महाराज कापरे,ह.भ.प.दुर्गादास महाराज नाणेकर, रावसाहेब महाराज जगताप,विश्वास महाराज घाडगे यांचे प्रवचन,ह.भ.प.संस्कृतीताई नाणेकर,भागवताचार्य शिवाजी महाराज चोरामले,ह.भ.प.प्रेममुर्ती नवनाथ महाराज लिमन,ह.भ.प.पांडूरंग महाराज शितोळे,ह.भ.प.चिंतन केसरी भरत महाराज थोरात,चंद्रकांत महाराज वांजळे,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज रासकर यांचे कीर्तन सप्ताह सोहळ्यात पार पडणार आहे. २७ नोव्हेंबरला सकाळी ९ ते ११ यावेळेत ह.भ.प.सतिश महाराज काळजे‌ यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाने सप्ताह सोहळा,ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोप होणार आहे असे दादासाहेब उर्फ संतोष उकिर्डे यांनी सांगितले. निमगाव म्हाळुंगी,चिंचोली मोराची, रांजणगाव गणपती,फलकेवाडी,कान्हूर मेसाई‌,खैरे वाडी,गणेगाव खालसा,वरूडे,शिंदेवाडी,पिंपरी दुमाला येथील भजनी मंडळाचा हरिजागर सप्ताह काळात पार पडणार आहे असेही दादासाहेब उर्फ संतोष उकिर्डे‌ यांनी कळविले आहे.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026