किराणा दुकानातून जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीस आळेफाटा पोलीसांकडून अटक
शिक्रापूर :- आळेफाटा येथील किराणा दुकानातून जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीस पोलीसांनी अटक करून त्याच्याकडून दोन कारसह ११ लाख ९६ हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
चोरीच्या या घटनेतील ७ आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी पत्रकारांना दिली.
सलमान सादिक शेख वय - २४ रा.मोमीनपुर,खाजानगर जि.बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत समजलेल्या माहितीनूसार, दि.२० जूनच्या मध्यरात्री आळेफाटा परिसरातील सुरेश भगवान खांडगे यांचे लक्ष्मी किराणा दुकानाच्या सिक्युरिटी गार्डला कारमधून आलेल्या चोरट्यांनी मारहाण करून त्याचा मोबाईल व रोख रक्कम घेवून त्यास शेजारील बोटा गावच्या हद्दीत सोडून दिले.यानंतर पुन्हा येथे येवून दुस-या कारमधून आलेल्या साथीदारांसह त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोख रक्कम,सिगारेट,गायछाप तंबाखू असा पावणेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
हा जबरी चोरीचा गुन्हा सलमान शेख व त्यांच्या साथीदारांनी केल्याचे पोलिसांना समजल्याने आळेफाटा पोलीसांनी बीड येथे जावून सलमान शेख याला ताब्यात घेतले. यावेळी इतर आरोपी फरार झाले. इतर साथीदारांसमवेत दोन कारमध्ये येवून चोरी केल्याची त्याने कबुली दिली.
गुन्ह्यात वापरलेल्या एम एच १२ डी वाय ५९२० व एम एच ०२ इ एच ४७५८ या दोन कार तसेच पावणेतीन लाखांचा मुद्देमाल असा एकूण ११ लाख ९६ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी आरोपीकडून जप्त केला.
.