• Total Visitor ( 481874 )
News photo

घरफोडी करणा-या टोळीस आळेफाटा पोलीसांकडून अटक       

Raju tapal July 21, 2025 80

घरफोडी करणा-या टोळीस आळेफाटा पोलीसांकडून अटक       



शिक्रापूर :- घरफोडी करणा-या टोळीस आळेफाटा पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीसांनी अटक केली आहे.

सोमनाथ भीमनाथ बामणे वय - ३७ रा‌.गुणवंतवाडी गुनाट ता‌.शिरूर,संदीप कैलास भालेराव वय -२८ रा‌.सुरेगाव ता‌.नेवासा जि‌.अहिल्यानगर,संदीप बबन धोत्रे वय -३७ रा‌.न्हावरे ता‌.शिरूर,श्रीमंत जीवलाल चव्हाण वय -५२ रा‌.देऊळगाव सिद्धी‌,अहिल्या नगर, आकाश लकड्या भोसले वय -१९ रा‌.शिरूर जि‌.पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिक अप क्रमांक एम एच १२ डब्ल्यू एक्स ८२०८, गुन्ह्यात चोरी केलेली १८०० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा एकूण १२ लाख‌ रूपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.

दि.५ जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास चेतन रमेश चौगुले यांच्या घराच्या खिडकीचे गंज कापून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम,सोन्याचे दागिने असा एकूण अडीच लाखांचा ऐवज चोरीस गेला होता. तसेच त्यांच्या जवळच राहाणारे प्रशांत अनंतराव चौगुले यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरातील चांदीची भांडी व रोख रक्कम मिळून २ लाख ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेला होता. सदरचा गुन्हा करतेवेळी आरोपींनी पांढ-या रंगाच्या महिंद्रा पिक अपचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींना शिरूर तसेच अहिल्यानगर मधून पोलीसांनी अटक केली.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement