अमोल रंगनाथ आरु हे पॅनल क्रमांक ३ मधून निवडणूक लढविणार
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पॅनल क्रमांक ३ मधून अनुसूचित जातीचे उमेदवार म्हणून समाजसेवक अमोल रंगनाथ आरू हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अमोल आरु यांचा जन्म आंबिवलीत झाला. त्यांचा इमारत विकासक म्हणून प्रवास सुरु असून त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांशी सलोख्याचे घरचे संबंध आहेत. अमोल आरु हे विविध अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप,जेवण वाटप व इतर साहित्याचे वाटप करीत असतात. समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ते वह्या पुस्तके व इतर शालेय साहित्य नेहमीच पुरवीत असतात. त्यांची समाजसेवेची आवड वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे काही हिंदी मराठी चित्रपटातील कलाकारांशी हि घरोब्याचे संबंध असून त्यांनी काही ठिकाणी आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक हि दाखवलेली आहे. हजरजबाबी,वेळेला नेहमीच सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा म्हणून अमोल आरु यांची परिसरात चांगलीच ओळख आहे. या ओळखीच्या जोरावर अमोल आरू पॅनल क्रमांक ३ मधून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या आरक्षणामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. त्यांचे सर्वच पक्षाशी असलेल्या सलोख्याचे संबंध आपली जनमानसात असलेली प्रतिमा व केलेल्या समाजसेवेच्या माध्यमातून नागरिक नक्कीच आपल्याला स्वीकारतील असा विश्वास अमोल आरु यांना वाटत असल्यामुळेच ते निवडणुकीच्या माध्यमातून आपले नशीब आजमावत आहे.