अमरावती जिल्हास्तरीय अधिकारी,कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
३१जानेवारी व १,२फेब्रुवारीला HVPMला आयोजन
अमरावती जिल्हा परिषदच्या ३हजार अधिकारी,कर्मचारी सहभागी होणार
अमरावती:- जिल्हा परिषद मधिल अधिकारी,कर्मचारी यांना दैनदीन कामातुन थोडी मुक्तता मिळावी म्हणुन अमरावती जिल्हा परिषदने अधिकारी,कर्मचारी यांचा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ३१जानेवारी व १,२फेब्रुवारीला जग प्रसिध्द श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे आयोजित करण्यात आल्या आहे.या महोत्सवात १५संघाचे ३हजार अधिकारी,कर्मचारी सहभागी होणार आहे. या जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सोहळा दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता,श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती येथे सुरुवात होईल.तर बक्षीस वितरण सोहळा दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती येथे होईल.सर्व सांघिक (क्रिकेट वगळता) स्पर्धांचे आयोजन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती येथे करण्यात आलेले आहे. (दि. ३१ जानेवारी २०२६ ला सकाळी ०९.०० वाजता पासून भाग्यपत्रकानुसार सुरु करण्यात येईल.तर कबड्डीचे सर्व सामने हे पारंपारिक पध्दतीने मातीच्या मैदानावर खेळविले जातील.वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन (दि.३१ जानेवारी २०२६ ला सकाळी ०९.०० वाजता पासून सुरु करण्यात येईल. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि.३१ जानेवारी व १फेब्रुवारी २०२६ ला संगीतसुर्य केशवराव भोसले सभागृह, (VMV), परतवाडा रोड,अमरावती येथे सायं. ०५.०० ते रात्री १०.०० या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.दिनांक ३१ जानेवारी व१फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाचा क्रमानुसार१) अंजनगाव २) चांदूर रेल्वे ३) वरुड ४) धामणगाव ५) तिवसा ६) धारणी ७) दर्यापूर ८) मोर्शी ९) अमरावती १०) चिखलदरा ११) मुख्यालय १२) भातकुली १३) नांदगाव १४) अधिकारी वर्ग १५) अचलपूर १६) चांदूरबाजार
दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम होईल.१) भक्तीगीत / भावगीत / लोकगीत: ४ मिनिटे (फक्त ऑर्केस्ट्रावर) २) सिनेगीत : ४ मिनिटे (फक्त ऑर्केस्ट्रावर युगल गीत महिला/पुरुष,पुरुष/पुरुष,महिला/महिला, एकल)३) कराओके : ४ मिनिटे,४) एकल नृत्य : ४ मिनिटे दिनांक १फेब्रुवारी २०२६ रोजी १) हास्य जत्रा ७ मिनिटे २) समूहनृत्य - ७ मिनिटे होणार आहे. क्रिकेट (दि.३१ जानेवारी २०२६ ला सकाळी ०९.०० वाजता पासून भाग्यपत्रकानुसार सुरु करण्यात येईल.हे सामने श्रीमती नरसम्मा महाविद्यालय,किरण नगर, जूना बायपास रोड, अमरावती येथे होणार अशी माहीती श्रीराम कुलकर्णी सचिव,जि.प. अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद,अमरावती,क्रीडा संयोजक डाॅ.नितिन उंडे यांनी दिली आहे असे क्रीडा महोत्सवाच्या प्रसिध्दी समितीने कळविले आहे.
बाँक्स-
सांघिक खेळा मध्ये क्रिकेट,खो-खो,कबडडी,व्हॉलीबॉल पासींग,व्हॉलीबॉल स्ट्रोक्स,फुटबॉल,बॅडमिंटन एकेरी,बॅडमिंटन दुहेरी,बॅडमिंटन एकेरी ४५ वर्षावरील, बॅडमिंटन दुहेरी ४५ वर्षावरील,टेबल टेनिस एकेरी,टेबल टेनिस दुहेरी,टेनिक्वॉईट एकेरी, टेनिक्वॉईट दुहेरी,कॅरम एकेरी,कॅरम दुहेरी याचा समावेश आहे.तर वैयक्तिक स्पर्धेत १०० मिटर धावणे,२०० मिटर धावणे,४०० मिटर धावणे,१५०० मिटर धावणे,१०० मिटर धावणे ४५वर्षावरील,१५०० मिटर धावणे ४५ वर्षावरील, रिले रेस ४x१००,लांब उडी,उंच उडी,थाळी फेक,गोळा फेक,भाला फेक,स्विमिंग ५०मी,
स्विमिंग १०० मी,स्विमिंग ५० मी (४५ वर्षावरील),स्विमिंग १०० मी (४५ वर्षावरील),बुद्धिबळ याचा समावेश आहे.