अमरावती जिल्हा परिषद अधिकारी,कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२६
अधिकारी,कर्मचारी यांनी सादर केला बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम
एकल व समुह नृत्याने गाजवला रंगमंच
अमरावती : अमरावती जिल्हा परिषदच्या अधिकारी,कर्मचारी यांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव शनिवार३१पासुन हनुमान प्रसारन मंडळ अमरावतीच्या मैदानावर सुरु झाला.अधिकारी,कर्मचारी यांचा सांस्कृतीक कार्यक्रम व्हीएमव्ही काॅलेजच्या संगीतसुर्य केशवराव भोसले सभागृहात सायंकाळी सादर झाला.बहारदार कार्यक्रमाने प्रेक्षकांची वाहावाह मिळवली. या सांस्कृतिक कार्यक्रमात चौदाही पंचायत समितीच्या अधिकारी,कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ यांनी गाणे सादर केले.तसेच भक्तीगीत/भावगीत/लोकगीत,सिनेगीत/युगलगीत आर्केस्ट्रावर- युगल गीत महिला/पुरुष,पुरुष/पुरुष,महिला/महिला,एकल)एकल नृत्य,समुहनृत्य सादर झाली. या मध्ये समूह नृत्य विजयी - नांदगाव ख.उपविजयी - अमरावती,एकल नृत्य
विजयी - योगिता चव्हाण,नांदगाव ख,उपविजयी - अमृता नायसे,वरूड
भावगीत/भक्तीगीत/लोकगीत विजयी - श्रीकांत मुंडेकर,चांदुर बा.
उपविजयी - किरण बुल,चिखलदरा सिनेगीत
विजयी - सविता मेश्राम,नांदगाव ख.,उपविजयी - अनिल माकोडे, चिखलदरा
यांना २फेब्रुवारीला बक्षिस देण्यात येणार.या कार्यक्रमाला मुकाअ.सजीता महापाञ,मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी पवार मॅडम,क्रीडा महोत्सवाचे सचिव श्रीराम कुळकर्णी,संयोजक डाॅ.नितिन उंडे,डाॅ.कैलास घोडकी,गटविकास अधिकारी खेडकर,भोरखडे,दांडगे उपस्थित होते.सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक उध्वव झुकरे,विद्या साळवे,नानासाहेब देशमुख,सुरेश चिमणकर हे होते.कार्यक्रमाचे बहादार सुञसंचालन शेख शकील यांनी केले असे क्रीडा महोत्सवाचे प्रसिध्दी प्रमुख विनोद गाडे,विनायक लकडे,राजेश सावरकर,पुनम उके,शरद गडीकर,हेमंतकुमार यावले यांनी कळविले आहे.