• Total Visitor ( 428041 )
News photo

युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला

Raju tapal June 04, 2025 72

युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला;

११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला 



किव :- रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. युक्रेनने ७२ तासांच्या आत रशियावर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. यावेळी युक्रेनियन सैन्याने ११०० किलो पाण्याखालील स्फोटके पेरून क्रिमिया पूल उडवून दिला. यामुळे पुलाचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. यापूर्वी १ जून रोजी युक्रेनने ड्रोन हल्ल्यात रशियाचे ५ लष्करी तळ उडवून दिले होते. यामध्ये युक्रेनने रशियाची ४१ लढाऊ विमाने नष्ट केल्याचा दावा केला होता.



युक्रेनच्या सुरक्षा सेवेनुसार आता या नवीन हल्ल्यात TNT स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. या हल्ल्यात क्रिमिया पुलाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतोय. हा रशियाला क्रिमियाशी जोडणाऱ्या एक धोरणात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या पूलावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याआधीही युक्रेनने अनेक वेळा हा पूल उडवण्याचा प्रयत्न केला होता. रशिया आणि युक्रेन दोघांसाठीही क्रिमिया पूल धोरणात्मकरित्या महत्त्वाचा आहे. हा रशियाने व्यापलेल्या क्रिमियाशी जोडणारा अतिशय महत्त्वाचा पूल आहे.



त्याला केर्च सामुद्रधुनी पूल असेही म्हणतात. हा पूल रशियाच्या मुख्य भूभागाला क्रिमियाशी जोडतो. रशियन सैन्यासाठी या मार्गाने क्रिमिया आणि दक्षिण युक्रेनला शस्त्रे, सैनिक आणि रसद पाठवण्याचा हा मुख्य मार्ग आहे. अशा परिस्थितीत, युक्रेनने या पुलाचे नुकसान करणे किंवा नष्ट करणे हे रशियन लष्करी पुरवठ्याचा कणा मोडण्यासारखे आहे. हा पूल २०१८ मध्ये बांधण्यात आला. २०१४ मध्ये रशियाने क्रिमियावर कायमचा ताबा मिळवण्याचे प्रतीक म्हणून तो बांधला होता. पण, युक्रेन आणि पाश्चात्य देशांसाठी हा पूल बेकायदेशीर ताब्याचे प्रतीक आहे. त्याला लक्ष्य करणे हे रशियाचे मनोबल कमकुवत करण्याचे आणि जगाला संदेश देण्याचा मार्ग आहे. या पुलाद्वारे व्यापार आणि पर्यटनाद्वारे क्रिमियाची अर्थव्यवस्था रशियाशी जोडलेली आहे. तो नष्ट केल्याने रशियन आर्थिक आणि नागरी जीवनावरही परिणाम होतो.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement