• Total Visitor ( 481772 )
News photo

आरामबसची पुढे चाललेल्या एर्टिगा मोटारीला धडक ; १६ जण जखमी

Raju tapal November 01, 2025 70

आरामबसची पुढे चाललेल्या एर्टिगा मोटारीला धडक ; १६ जण जखमी





पुणे -अहिल्यानगर महामार्गावर खंडाळेमाथा येथे अपघात 

   

शिक्रापूर (प्रतिनिधी):- चालकाचा ताबा सुटलेल्या आरामबसची पुढे चाललेल्या एर्टिगा कारला‌ धडक बसून तसेच दुस-या एका बसवर जावून आदळल्याने १६ प्रवासी जखमी झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावर खंडाळे माथा येथे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाता बाबत समजलेल्या माहितीनुसार,बसचालक सचिन किसन तायडे रा‌.मंगळूर नवघरे ता‌.चिखली जि‌.बुलढाणा हा आपल्या ताब्यातील एम एच १४ सी डब्लयू ४१५५ या क्रमांकाची खाजगी आराम बस घेवून पुण्याच्या दिशेने भरधाव घेवून निघाला असताना खंडाळे माथ्याजवळील हाॅटेल नम्रता जवळ तीव्र वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने.पुढे चाललेल्या एम एच १२ यु सी ३६८६ या क्रमांकाच्या एर्टिगा कारला‌ उजव्या बाजूने कारला धडक बसली. त्यामुळे कार रस्त्याच्या खाली गेली. त्याच अवस्थेत पुढे चाललेल्या एम एच १९ सी एक्स ४८८४ या क्रमांकाच्या बसवर ही आराम बस आदळली. जखमींची नावे पुढीलप्रमाणे:- सचिन किसन तायडे वय ३२ रा.चिखली जि.बुलढाणा, शेरखान अजित मुल्ला रा‌.च-होली आळंदी रोड जि.पुणे,सिद्धार्थ अशोक इंगळे पातूर जि.अकोला‌,सौरभ रामचंद्र देशमुख असिक असद शेख,चित्रा रमेश जोशी,राज पंजाबराव सुरवारे‌ सर्वजण रा‌.खामगाव जि.बुलढाणा,कैस्सार जुबेर शेख,गुड्डू छेगझास दोघे रा‌.छत्रपती संभाजीनगर,बंडू जवाहर जगताप चिंचवड जि.पुणे,अनिल वासूदेव सावंत दोघे रा‌.धामणा जि.अकोला,पृथ्वीराज राहूल इंगळे प्राची केदार बर्वे रा‌.शिवाजीनगर जि‌.पुणे संगिता शंकर माहुरे‌ रा‌.हिंजवडी ,मुळशी जि.पुणे काव्या सचिन विधाटे रा‌.बाणेर पुणे हे या अपघातात जखमी झाले असून रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष पवार अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement