• Total Visitor ( 481858 )
News photo

आंबळे गावात सशस्त्र दरोडा; पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास 

Raju tapal June 07, 2025 102

आंबळे गावात सशस्त्र दरोडा; पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास 



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- लोखंडी गजाने दरवाजा उचकटून घरात शिरलेल्या सशस्त्र चोरट्यांनी घरात झोपलेल्या दाम्पत्याला मारहाण करत २५ हजार रोख रकमेसह सुमारे पावणेदोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना शिरूर तालुक्यातील आंबळे गावाजवळील सोनखीळा वस्तीवर शुक्रवारी ६ जूनला मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली.

रमेश ज्ञानदेव फुलपगर‌ वय -५४ यांचा आंबळेजवळील सोनखीळावस्ती‌ येथे शेती व्यवसाय असून त्यांची दोन्ही मुले नोकरी निमित्त बाहेरगावी असल्याने पती- पत्नी दोघेच वास्तव्यास होते.मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास चौघांनी त्यांच्या घराचा दरवाजा खालील बाजूने उचकटून कडी ढिली करून घरात प्रवेश केला.चौघांच्याही हातात लाकडी दांडके ,सुरे होते.आवाजाने फुलपगर‌ पती -पत्नी जागे झाले असता रमेश फुलपगर‌ यांना चोरट्यांनी काठीने मारहाण केली.या दाम्पत्याने‌ मारू नका अशी विनंती केली असता चोरट्यांपैकी एकाने ललिता फुलपगर यांचे केस पकडून दुस-याने त्यांच्या गळ्यातील गंठण, कर्णफुले ओरबाडून नेले.पैंजणही ओढून काढून घेतले.रमेश फुलपगर‌ यांचा मोबाईलही‌ हिसकावून फोडून टाकला.

चोरटे घराच्या मागील बाजूने पळून गेल्यानंतर फुलपगर‌ दाम्पत्याने‌ मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर बाबू‌ फुलपगर‌, अण्णा बेंद्रे,स्वप्नील बेंद्रे,बाळू‌ झेंडे, संतोष बेंद्रे, दत्तात्रय बेंद्रे, चंद्रकांत बेंद्रे, गणेश बेंद्रे, आशुतोष बेंद्रे, सचिन झेंडे‌ मदतीसाठी धावले.अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पळून गेल्यानंतर फुलपगर दाम्पत्याने‌ घरात सर्वत्र शोधाशोध केली असता चोरट्यांनी घरातील दोन कपाटातील कपडे व सामानाची उचकापाचक करून कपाटातील सोन्याच्या तीन नथी‌, २० हजार रूपयांची रोकड,घरातील टेबलावरील पाकीटातील अडीच हजार रूपये चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

रमेश ज्ञानदेव फुलपगर‌ यांनी चोरीच्या या घटनेची शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस उपनिरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके यांनी पोलिसांसह घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके चोरीच्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement