• Total Visitor ( 701132 )
News photo

कोंढापुरीत पावसाचे आगमन

Raju Tapal publisher May 22, 2026 118

कोंढापुरीत पावसाचे आगमन

 

शिरूर:- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज दुपारी पावसाचे आगमन झाले.

विजांचा कडकडाट,ढगांच्या गडगडाटासह शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी दुपारी २ वाजून १० मिनिटांच्या सुमारास पावसास सुरूवात झाली. कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठा तळाला गेला आहे.तलावातील पाणीसाठा आठवडाभरात संपण्याच्या मार्गावर आहे. तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर असल्याने काही शेतक-यांनी आपले विद्यूतपंप,केबल चोरीस जावू नये म्हणून आपापल्या घरी नेवून सुरक्षित ठेवले. काही शेतक-यांनी खोडवा ऊसाची बांधणी करून बांधणी केलेल्या ऊसाला खतेही टाकली.

पाझर तलावात पाणी नसल्याने खते टाकून बांधणी केलेल्या ऊसाला पाणी देणे अशक्य झाल्याने शेतक-यांची चिंता वाढली होती.

आज शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी दुपारी सव्वादोन वाजता मुसळधार पावसास सुरूवात झाल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. दुपारचे पावणे तीन वाजल्यानंतरही पावसाच्या धारा चालू होत्या. दरम्यान,चासकमान धरणातील पाणी २८ मे २०२६ नंतर कोंढापुरी येथील पाझर तलावात सोडण्यात येणार आहे असे समजते.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026