केडीएमसी निवडणूकात मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आगामी निवडणूकात मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी संजय जाधव नोडलं अधिकारी स्विफ टीम यांच्या मार्गदर्शनाखाली,कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. त्यानुसार शिक्षण विभागाच्या दिनांक 19/ 12/ 2025 चे पत्रान्वये शाळा महाविद्यालयांना मतदान जनजागृती बाबत पत्राद्वारे कळवण्यात आलेले आहे त्यानुसार शाळा महाविद्यालयांमध्ये चित्रकला स्पर्धा,वादविवाद स्पर्धा,रॅली,चित्रकला पथनाट्य,रिल्स,घोषवाक्य स्पर्धा,मतदान प्रतिज्ञा,मानवी साखळी इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये केसी गांधी स्कूल,राष्ट्रीय विद्यालय,इत्यादी शाळांनी सहभाग घेतलेला आहे