• Total Visitor ( 481894 )
News photo

टिटवाळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीम चार दिवसांपासून बंदच

Raju tapal June 03, 2025 72

टिटवाळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीम चार दिवसांपासून बंदच



राजू टपाल

टिटवाळा :- बँकिंग क्षेत्रात अध्ययावत तंत्रदानाचा अटॉमेटेड ट्रेलर मशिन्स अर्थात एटीएम चा जस जसा प्रसार होत असतानाच त्याच बरोबर तांत्रिक गोंधळ हि सुरु झाला आहे.खाजगी क्षेत्रातील बँकाच्या मनमानी चार्जेस वसुली पासून वाचण्यासाठी सर्वसामान्य मध्यमवर्गीय मोठा सरकारी बँकामध्ये आपले खाते उघडतो.मात्र या बँकाच्या व्यवस्थापनाना आपला सरकारी खाक्या सोडून देऊन आपल्या एटीएम स्विचेच व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.त्याचे कारण हि तसेच आहे कारण टिटवाळा स्टेशन जवळ असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र या शेखेचे एटीएम गेल्या चार दिवसांपासून बंद असून त्यामुळे नागरिकांना पॆसे काढण्यासाठी आता रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे किंवा दुसऱ्या बँकाच्या एटीम मध्ये जावं  लागेल आहे.बँक ऑफ महाराष्ट्र टिटवाळा आज घडीला सर्वसाधारण दहा हजारांच्या आसपास ग्राहक आहेत. मात्र ग्राहकांना योग्य सोयीसुविधा पुरविण्यास बँकेला नेहमीच अपयश येत असते. कधी कर्मचाऱ्यांची कमतरता,कधी सोयी सुविधांची वानवा,नेट प्रॉब्लेम चा इश्यू तर कधी कधी बँकेत मॅनेजरच नसतो असा आजवरचा ग्राहकांना अनुभव आहे. त्यातच बँकेच्या बाहेरच्या बाजूला लावलेले पासबुक प्रिंटर मशीन व एटीएम कार्ड मशीन यांची हि अनेकदा दुरावस्था होत असते.आताही गेल्या शुक्रवारी एका एटीएम ग्राहकांचे कार्ड मशीनमध्ये अडकल्याने ते काढण्याच्या प्रयत्नात मशील मधील दांडा तुटून मशीन बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ऐन सुट्टीच्या दिवशी व ज्येष्ठ नागरिकांना खात्यात पेन्शन येण्याच्या वेळेसच सदरील एटीएम कार्ड मशिन बंद पडल्याने ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी मोठ्या जिकीरीचा सामना करावा लागतो आहे. त्यातच स्टेशन जवळच एटीएम सेंटर असल्याने रेल्वे प्रवाशी वसा इतर बँकेच्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी सोपे जात होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून एटीएम मशीन बंद पडल्याने आणि अजूनही आठ दिवस ते सुरु होण्याची सुतराम शक्यता नसल्याने ग्राहकाना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत बँकेचे मॅनेजर गौरव यादव यांच्याकडे विचारणा केली असता,त्यांनी सांगितले कि, एका व्यक्तच एटीएम कार्ड त्यात अडकल्यामुळे सदरील एटीएम सेंटर बंद आहे. त्याबाबत वरिष्ठाना कळवले असून त्याची ते दखल घेतील अगोदर खाजगी एजन्सी वाल्याना एटीम च्या देखभाल दुरुस्तीचे कॉन्ट्रॅक्ट होते ते आता बँक स्वतः करीत आहे. त्यांनी एटीएमच्या इंजिनिअर ला आज सोमवारी अनेकदा फोन केल्याचे सांगितले. एक दोन दिवसांत एटीएम चालू होण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. 

मात्र संबंधित एटीएम देखभाल दुरुस्ती करणारा इसम अगोदर येऊन चेक करणार,काय तांत्रिक बिगाड झालाय त्याची तपासणी करणार. त्यानंतर बँकेला त्याबाबत कोटेशन देणार,त्यानंतर सदरील कोटेशन पास  व्हायला जाईल. बँकेने कोटेशन पास केल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरु व्हायला एक ते दोन आठवडे जाणार असल्याचे समजते. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना तरी किमान दोन आठवडे तरी हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement