• Total Visitor ( 84191 )

भटक्या विमुक्त समाजावर आघाडीच्या अडीच वर्षात अन्याय झाला

Raju Tapal September 26, 2022 30

भटक्या विमुक्तांना भाजपा - शिवसेना युती सरकार न्याय देईल - माजी आमदार नरेंद्र पवार
भटक्या विमुक्त समाजावर आघाडीच्या अडीच वर्षात अन्याय झाला - माजी आमदार नरेंद्र पवार
उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या सुरुवातीला नाशिकमध्ये नरेंद्र पवारांचे प्रतिपादन


 भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, माजलगाव, अहमदनगर या तीन दिवसांच्या संघटनात्मक दौऱ्याला प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नाशिक येथून सुरुवात केली. त्यामध्ये नाशिक येथे भाजपा भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी व कार्यकर्ते आढावा बैठक संपन्न झाली.
भाजपा पक्षवाढीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या अडीच वर्षात भटक्या विमुक्त समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला, आघाडी सरकारने भटक्या विमुक्तांच्या अनेक सवलती रद्द केल्या होत्या, आत्ता आपल्या हक्काचे युती सरकार आले आहे, भटक्या विमुक्तांना न्याय देईल, योजना मिळतील. कार्यकर्त्यांनी सामान्य माणसांसाठी योजनांवर काम करण्याचे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी बोलताना केले.
दरम्यान भटक्या विमुक्त समाजाचे संघटन वाढले पाहीजे, त्यांचे प्रश्न आणि अडचणी सरकार दरबारी मांडून त्यावर निश्चितपणे तोडगा काढण्यासाठी आपण सर्वांनी काम करण्याचा निश्चयही यावेळी व्यक्त केला.
त्यानंतर हौशी रोप स्कीपिंग असोसिएशन (महाराष्ट्र) व क्रीडा भारती नाशिक यांच्या वतीने आयोजित 5 वि राज्यस्तरीय रोप स्कीपिंग अजिंक्यपद स्पर्धा 2022 उद्घाटन संपन्न झाली, त्या ठिकाणीही नरेंद्र पवार यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
फ़ीट राहण्यासाठी रोप स्कीपिंग सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. एकाग्रता सुधारते, अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व शाळा, सर्व प्रकारच्या शिक्षकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात अशीच स्पर्धा भरण्यासाठी मी पुढाकार घेईन, आणि या क्रीडा प्रकाराचा समावेश प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीतील शासकीय कार्यक्रमात या होण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वस्त स्पर्धकांना आश्वस्त केले.

यावेळी प्रदेश पदाधिकारी लक्ष्मणराव सावजी, भ.वि.आ.प्रदेश सहसंयोजक गोविंदा गुंजाळकर, शिवाजी अव्हाड, राजू साळुंखे, उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे, संपत नागरे, बापू शिंदे, नाशिक ग्रामीण अध्यक्ष श्री. रवि गांगोळ, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजाभाऊ सौदे,रचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक नितीन ठाकरे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय उपसंचालक सुनंदा पाटील,अध्यक्ष नाशिक रोप स्किपिंग संघटना श्याम बडोदे,अध्यक्ष क्रीडा भारती नाशिक विनोद शिरभाते, प्रदेश सचिव राजु नायर, राजू जाधव, पिंटू बंजारा, नाशिक युवा शहराध्यक्ष शरद जाधव,रवी शिंदे, मंजुषा दराडे, मंजुषा बिडगर, विद्या गोसावी, जिल्हा क्रीडा अधिकारी,नाशिक अविनाश टिळे आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement