पंचशील मित्र मंडळ भिमनगर हेदुटणे यांच्या वतीने भीमजयंती उत्सव साजरा,
कल्याण :- पंचशील मित्र मंडळ भिमनगर हेदुटणे यांच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन हेदुटणे येथे करण्यात आले होते,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली, मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते, मिरवणुकीत माजी नगरसेवक महेश पाटील सहभागी झाले होते, मिरवणूक संपल्यानंतर महापुरुषांचा प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, बौद्ध पुजा बौद्धचार्य प्रदिप जाधव यांनी पार पाडला,पंचशील मिंत्र मंडळ भिमनगर हेदुटणे यांच्या वतीने उपस्थित पाहुणे याचा सन्मान करण्यात आला, तसेच दिव्यांग कलाकार बबलु जाधव व त्याचे सहकारी यांनी भिम बुद्ध गीतीचा सुंदर कार्यक्रम सादर केला,
पंचशील मंडळाचे अध्यक्ष राजेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला,
यावेळी कार्यक्रमाला माजी नगरसेवक महेश पाटील, मानपाडा पोलीस स्टेशनचे पी एस आय माघाडे सर,खोणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हनुमान ठोंबरे, माजी सरपंच विलास कुंडलीक भंडारी, माजी सरपंच हरिश्चंद्र भंडारी,पत्रकार विलास भोईर, नितेश भंडारी,जेष्ठ कार्यकर्ते भगवान जाधव, धोंडू जाधव, भालचंद्र जाधव, बाळाराम जाधव, काळुराम जाधव,दिपक भाळेराव,तसेच मंडळाचे उपाध्यक्ष गुरुनाथ जाधव, सचिव रामचंद्र जाधव, खजिनदार जयेश गायकवाड, रुपेश जाधव, नितेश जाधव, गणपत जाधव, ज्योती जाधव, निलम जाधव, संगिता जाधव आदि उपस्थित होते,
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे सदस्य मिलींद जाधव, दिपक जाधव, अशिष जगताप, मंगेश जाधव, महेश गायकवाड, अविनाश जाधव, निलेश जाधव, संकेत जाधव, सुमित जाधव, अनिकेत जाधव, कैलास जाधव, विनोद जाधव, पिंटया जाधव, नरेश जाधव, सिध्दार्थ सोनावणे सह मंडळाच्या सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली,