• Total Visitor ( 428045 )
News photo

 70 हजारांचे हेल्मेट असतानाही दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

Raju tapal April 22, 2025 111

 70 हजारांचे हेल्मेट असतानाही दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू



कोल्हापूर:- लाखो रुपये किमतीची दुचाकी आणि 70 हजार रुपये किमतीचे अत्याधुनिक हेल्मेट असतानाही आजरा-आंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कोल्हापुरातील तरुण दुचाकीस्वार सिद्धेश विलास रेडेकर (25, रा.माळी कॉलनी टाकाळा, कोल्हापूर) या युवकाचा दुर्दैवी अंत झाला.



सिद्धेश रेडेकर याला मोटारसायकल रायडिंगची आवड होती. रविवारी सकाळी सहकारी मित्र फरहाद खान, नितांत कोराणे, अभय रेडीज (रा. कोल्हापूर) यांच्यासमवेत रायडिंग करत आंबोली येथे गेले. आंबोली घाट येथून परतत असताना देवर्डे ते माद्याळ दरम्यान कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाणार्‍या चारचाकी वाहनाची मोटारसायकलला जोरात धडक बसली.



सिद्धेश आर्किटेक्टचा विद्यार्थी



या भीषण अपघातात सिद्धेश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सिद्धेश हा आर्किटेक्टचे शिक्षण घेत होता. त्याच्या मागे आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.



हेल्मेटचेही तुकडे



सिद्धेशच्या अपघाती मृत्यूने मित्रांना अश्रू अनावर झाले होते. कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. अपघातात दोन्हीही वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. हेल्मेटचेही तुकडे झाले होते. येथील बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा सिद्धेश हा मुलगा. अपघातात सिद्धेशचा मृत्यू झाल्याचे समजताच रेडेकर कुटुंबीयांसह नातेवाईक तसेच सिद्धेशच्या मित्रांनी सकाळी शासकीय रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. या घटनेमुळे टाकाळा परिसरात शोककळा पसरली होती.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement