• Total Visitor ( 706421 )
News photo

जुन्नरमधील भाजप नेत्या आशाताई बुचके यांचे निधन 

Raju Tapal publisher September 14, 2026 36

जुन्नरमधील भाजप नेत्या आशाताई बुचके यांचे निधन 



शिरूर:- जुन्नर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके यांचे मुंबई येथे रूग्णालयात निधन झाले. त्यांचे वय ६० वर्षे होते. भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्या म्हणून त्या मुंबई येथे कार्यरत होत्या. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी त्यांना २००७ मध्ये सावरगाव -येणेरे गटातून शिवसेनेची उमेदवारी दिली होती. शिवसेनेकडून सलग ४ वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या होत्या.शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख ते जिल्हा परिषद गटनेत्या असा त्यांचा प्रवास राहिला. शिवसेनेची जुन्नर तालुक्यातील पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान राहिले.त्यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर पंचायत समिती,नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकला होता. २००९ ते २०२४ दरम्यान ४ वेळा जुन्नर विधानसभा निवडणूक त्यांनी लढविली होती.चारही विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांचे आमदारकीचे स्वप्न अपूर्ण राहिले.१९ आॅगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.फेब्रुवारी २०२६ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.मागील दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.मुंबई‌ येथील रूग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाल्याचे समजले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement