पुणे जिल्ह्यातून विविध गुन्ह्यांतील पाच आरोपी हद्दपार
लोणीकंद पोलिसांची टोळीविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई
लोणीकंद:- लोणीकंद पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड वरील खून,खंडणीसह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पाच आरोपींवर पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये सचिन किसन शिंदे (वय ३९,रा.शिंदेवस्ती,लोणीकंद),हर्षद कुमार शिंदे (वय २४),अजिंक्य दादासाहेब म्हस्कुटे (वय २७,रा.खामगाव,ता.दौंड),संतोष गोविंद जाधव (वय १८,रा.लोणीकंद) आणि प्रकाश बाबुराव शिवभक्ते (वय २५,रा.खडक आळी,लोणीकंद) यांचा समावेश आहे. या पाचही आरोपींना एक वर्षासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने त्यांच्याविरुद्ध तडीपार कारवाईचा प्रस्ताव पोलिसांकडून सादर करण्यात आला होता. संबंधित प्राधिकरणाच्या आदेशानंतर पाचही आरोपींना पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सहपोलीस आयुक्त संजय दराडे,अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील,पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे,पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कागणे, पोलीस नाईक जी.डी.दळवी,पोलीस अंमलदार एस.डी.सातव,महिला पोलीस अंमलदार जे.एस.कुटे,पोलीस हवालदार जया थिटे व नवनाथ शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहील. सुनिता रोकडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,लोणीकंद.