• Total Visitor ( 481777 )
News photo

भिवंडीत भाजप पदाधिकाऱ्याची कार्यालयातच हत्या

Raju tapal August 12, 2025 122

भिवंडीत भाजप पदाधिकाऱ्याची कार्यालयातच हत्या;

सहकाऱ्यालाही संपवले;

दुहेरी हत्याकांडाने भिवंडी हादरले 



ठाणे :- ठाण्यातील भिवंडी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. रात्री ११ वाजता भाजप पदाधिकाऱ्यासह एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीमधील युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्षाची हत्या झाल्याने ठाण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची तात्काळ तपासणी करण्यात येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.



प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत. तर धीरज तांगडी जखमी असून त्याच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रफुल्ल तांगडी हे भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. भिवंडीत तालुक्यातील खार्डी येथे रात्री ११ वाजता दुहेरी हत्याकांडाचा थरार घडला. या घटनेनंतर भिवंडी आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक वर्षा पूर्वी प्रफुल्ल तांगडी यावर हल्ला झाला होता, त्यानंतर आता पुन्हा हल्ला करण्यात आला. चार ते पाच हल्लेखोरांनी हल्ला करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.



दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवण्यात आला आहे. जखमी धीरज याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. भिवंडी पोलिसांकडून खार्डीमधील घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासण्यात येत आहे. पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आपल्या जे.डी.टी. इंटरप्रायझेस कार्यालयात दोन सहकाऱ्यांसह बसले होते. त्याचवेळी चार ते पाच हल्लेखोरांनी तिथे येऊन धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक सहकारी जखमी झाला आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement