भवरापूर येथे कार; दुचाकीचा अपघात
शिरूर :- हवेली तालुक्यातील भवरापूर येथील ग्रामपंचायतीजवळ शुक्रवार दि.१८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान कार - दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
हा अपघात अष्टापूर - उरूळी कांचन रस्त्यावर भवरापूर ग्रामपंचायती जवळ असलेल्या विद्यूतरोहित्राजवळ भर दुपारी झाला.
भवरापूर येथील शेतकरी रस्त्याच्या कडेला झाडाखाली त्यांची मोटरसायकल उभी करून रस्त्याच्या कडेला असलेल्या त्यांच्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी,औषध फवारण्यासाठी गेले होते. त्याच रस्त्यावरून प्रवास करणारी कार मोटरसायकलला धडकून रस्त्याला कडेला असलेल्या विद्यूतरोहित्राजवळील खड्ड्यात कलंडली.
डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे कारचालकाने प्रत्यक्षदर्शिंना सांगितले. कारचालक,दुचाकीचालक शेतक-याचे नाव समजू शकले नाही.
अपघातग्रस्त कारच्या जवळच विद्यूतरोहित्र असून मोठी दुर्घटना होण्यापासून कारचालक तसेच कार, मोटारसायकलचालक बचावले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे)