बेकायदेशीररित्या मासे वाहतूक करणा-या पिक अप चालकावर गुन्हा दाखल
शिरूर:-बेकायदेशीररित्या मांगूर जातीचे मासे वाहतूक करणा-या पिक अप चालकावर उरूळी कांचन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.अर्शद अली महम्मद अली शेख वय ३० वर्षे,रा.एच नंबर ६७७ संघर्षमित्र नगर जी एम हाॅस्पिटल शेजारी भिवंडी,ठाणे असे गुन्हा दाखल झालेल्या पिक अप चालकाचे नाव असून उरूळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई तात्याराम अंकुश करे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.फिर्यादीत असे म्हटले आहे, दिनांक १६/०५/२०२६ रोजी ८ वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास मौजे सोरतपावाडी,ता.हवेली जि.पुणे गावचे हददीतील म्हसोबा मंदीरासमोर,सोलापूर पुणे हायवे रोडवर असलेल्या पिकअप गाडी नं.एम.एच/04/एल.क्यू/7657 ही मध्ये मांगूर जातीचे मासे बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळून आल्याने तसेच शासकीय आदेशाची आवज्ञा करुन पर्यावरणास धोका निर्माण करुन तसेच त्याचे खाण्याने लोकांना गंभीर आजार होवून दुखापत होण्याची जाणीव असताना त्याची वाहतूक करीत असल्याचे मिळून आला आहे म्हणून माझी पिकअप गाडी नं.एम.एच/04/एल.क्यु/7657 वरील चालक नामे अर्षदअली महम्मदअली शेख,वय-38 वर्षे, रा. एच.नं. 677 संघमित्र नगर,जी. एम. हॉस्पीटल शेजारी,भिवंडी,ठाणे याचेविरुदध कायदेशीर फिर्याद आहे.पोलीस हवालदार सचिन मोरे पुढील तपास करत आहेत.