• Total Visitor ( 429992 )
News photo

मराठा आरक्षणाच्या विजयाचा शिरूर शहरासह ठिकठिकाणी जल्लोष 

Raju tapal September 04, 2025 55

मराठा आरक्षणाच्या विजयाचा शिरूर शहरासह ठिकठिकाणी जल्लोष 



विजय ढमढेरे (प्रतिनिधी) 

शिक्रापूर :- मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळाल्यानंतर शिरूर शहरासह रांजणगाव गणपती, शिक्रापूर येथे मोठा जल्लोष करण्यात आला.

शासनाने बहुतांश मागण्या मान्य केल्याचे वृत्त प्रसारित होताच मराठा समाजाच्या एकजुटीचा, लढ्याच्या ताकदीचा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी शिरूर मधील शेकडो कार्यकर्ते एकत्रित आले.

शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाज संघटना,मराठा महासंघ, श्रीराम सेना तसेच इतर सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन फटाक्यांची आतषबाजी,गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात एक मराठा -लाख मराठा,मनोज जरांगे पाटील झिंदाबाद अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा केला.

रांजणगाव गणपती येथे बसस्थानक परिसरात मराठा बांधवांनी गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.

शिक्रापूर येथील पाबळ चौकात फटाक्यांच्या आतषबाजीत,एकमेकांसह मुंबईहून परतणा-या समाजबांधवांना पेढे भरवून आरक्षणाच्या विजयाचा जल्लोष केला.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement