• Total Visitor ( 385199 )
News photo

धामारी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यवर्धिनी पथकाला मानाचे प्रमाणपत्र 

Raju tapal December 24, 2025 48

धामारी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्यवर्धिनी पथकाला मानाचे प्रमाणपत्र 

       

शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,धामारी येथील आरोग्यवर्धिनी पथकाची "NABH" (National Accreditation Board for Hospitals and Healthcare Providers) व "NAM" (National AYUSH Mission) अंतर्गत उत्कृष्ट कार्याची नोंद घेत मानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. मानाचे प्रमाणपत्र वितरण सोहळा जिल्हाधिकारी मा. सतीश राऊत साहेब व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला. हे प्रमाणपत्र आरोग्यवर्धिनी पथक प्रमुख डॉ. बावस्कर तसेच संपूर्ण आरोग्यवर्धिनी पथक, धामारी यांच्या वतीने आज स्वीकारण्यात आले. हा सन्मान म्हणजे संघभावनेने,निष्ठेने व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांची पावती असून प्राथमिक आरोग्य सेवेत धामारी केंद्राने आदर्श निर्माण केला आहे असे अंकुशराव घारे यांनी सांगितले.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement