• Total Visitor ( 435161 )
News photo

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी;

Raju tapal August 14, 2025 62

 

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी;

10 जणांचा मृत्यू;

बचावकार्य सुरू



श्रीनगर :- जम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटी झाल्याची घटना समोर आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. आज गुरुवारी दुपारी १२.३० वाजता जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार उपविभागात ढगफुटी झाली. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढ्याची शक्यता आहे. तथापि, प्रशासनाने अद्याप मृतांची संख्या निश्चित केलेली नाही.



याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, या घटनेबाबत मला जम्मू काश्मीर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांनी माहिती दिली. त्यानंतर मी किश्तवाडचे उपायुक्त पंजक कुमार शर्मा यांच्याशी दुर्घटनेबाबत चर्चा केली. चिशोटी परिसरात ढगफुटीची मोठी घटना घडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असण्यीची बीती आहे. बचाव पथकाला घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे. 



तसेच झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितले की स्थानिक पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याला वेग देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, उपराज्यपालांना मृतांप्रति दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement