टिटवाळ्यामध्ये क्रेझी सायन्स वर्कशॉप संपन्न
The Science Point Activity Adda,Titwala आणि यंग सायंटिस्ट,टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित क्रेझी सायन्स वर्कशॉप टिटवाळ्यामध्ये संपन्न झाले. विज्ञान पाठ नका करू तर स्वतः करून पाहा ह्या विचारावर आधारित या वर्कशॉप मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मानसशास्त्रावर आधारिक प्रयोग करून दाखवले गेले. The Science Point Activity Adda नेहमीच असे वेगवेगळे वर्कशॉप करत असते. यामध्ये आकाशनिरिक्षण,इलेक्ट्रॉनिक्स,मॅग्नेटिझम,DIY सारखे वर्कशॉप करून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनच महत्व पटवून देण्याचा कायमच प्रयत्न असतो. प्रश्न विचारणे,निरीक्षण करणे,प्रयोगाअंती निष्कर्ष काढणे या बाबी विज्ञान समजून घेण्याच्या पद्धती आहेत. विविध प्रयोगांतून मुलांना याचा अनुभव करून देण्यात आला. आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनच अंगिकारला विसरलो म्हणून अशा वर्कशॉपची गरज आहे,अस TSP चे श्री किशोर पाटील सर उपक्रमाची गरज व्यक्त करताना बोलले. यावेळी टिटवाळासह कल्याण आणि भिवंडीतून आलेले विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला यंग सायंटिस्ट टिटवाळा चे आरुष पाटील यांचे सहकार्य लाभले