• Total Visitor ( 430209 )

कल्याण डोंबिवलीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी!

Raju tapal October 27, 2025 80

कल्याण डोंबिवलीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी!

आचार्य अत्रे रंगमंदिरात दिनांक 29 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक महोत्सव आणि दिनांक 30 ऑक्टोबर रोजी महापालिका अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण



दिनांक एक ऑक्टोबर रोजी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिन व महापालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून  दिनांक 29 ऑक्टोबर सकाळी 10.00  वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तर दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.00 वाजल्यापासून महापालिका अधिकारी/ कर्मचारी वर्गाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये दिनांक 29 ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,ज्येष्ठ नागरिकांनी सादर केलेले संगीत,नृत्य व नाट्य सादरीकरण,निवडक हास्य कविता व विडंबन गीते सादरीकरण, आरोग्य विषयक मार्गदर्शन,ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा इ.कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागाची संधी देऊन त्यांचा आनंद वृद्धिंगत करणे,त्यांच्या आनंदी आयुष्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत महापालिकेच्या अधिकारी /कर्मचारी वर्गाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement