• Total Visitor ( 515630 )
News photo

एम पी डि ए कायद्यांतर्गत शिरूर तालुक्यातील धोकादायक इसम नागपूर कारागृहात स्थानबद्ध

Raju Tapal publisher May 16, 2026 46

एम पी डि ए कायद्यांतर्गत शिरूर तालुक्यातील धोकादायक इसम नागपूर कारागृहात स्थानबद्ध



शिरूर:-शिरूर तालुक्यातील धोकादायक इसमाला एम पी डि ए कायद्यांतर्गत नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वास्तव्यास असलेला धोकादायक इसम सुरज राजेश पाडळे‌ वय वर्षे -२६ रा‌.सोनेसा़गवी ता‌.शिरूर याच्याविरूद्ध घातक हत्यारासह दरोडा घालणे,बेकायदेशीर जमाव जमवून खंडणीसाठी फिर्यादीला क्षती पोहचविण्याची भिती घालील व इच्छापूर्वक दुखापत पोहचविणे अन्यायाची आगळीक करणे,गैरपणे परिरोध करणे,बेकायदेशीरपणे अग्निक्षस्त्र बाळगणे,संगतमत करून घातक हत्यारांसह प्रतिबंध केलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे,दहशत पसरविणे असे जुना भारतीय दंड विधान प्रकरण १७ तसेच भारतीय न्यायसंहिता २०२३ चे प्रकरण ०६ व १७ तसेच भारतीय हत्यार कायदा १९५९ चे प्रकरण ०५ मध्ये नमूद केलेप्रमाणे ५ गंभीर गुन्हे दाखल होते.तो सराईत धोकादायक असल्याने त्यांच्याविरुद्ध एम पी डी ए कायद्यांतर्गत कार्यवाही होणेकामी रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीपसिंह गिल्ल यांना प्रस्ताव सादर केला होता.सदर प्रस्तावाचे अवलोकन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी करून तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करिता माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला होता.जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी जितेंद्र हुडी‌ यांनी सुरज राजेश पाडळे रा‌.सोनेसांगवी ता‌.शिरूर याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारची कृत्ये करण्यापासून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड,हातभट्टीवाले,औषधोद्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती,दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती,वाळूतस्कर,अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणा-या,बेकायदेशीर जुगार,बेकायदेशीर लाॅटरी चालवणा-या,मानवी अपव्यापार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत मुख्य अधिनियम १९८१ चा सुधारणा अधिनियम सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ अन्वये आदेश पगम/ एम पी डि ए /एस आर १०/०१/२०२६ दिनांक १२/५/२०२६ अन्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला.स्थानबद्धतेच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलिस अधिकारी,अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून त्यांच्या मदतीने आरोपी सुरज‌ राजेश पाडळे‌ याचा शोध घेवून त्यास १३/०५/२०२६ रोजी ताब्यात घेवून नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करून स्थान बद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement